ठळक मुद्दे इमरान आणि अवंतिकामध्ये दुरावा आला आहे.अवंतिका तिच्यासोबत मुलगी इमाराला सुद्धा घेऊन गेली आहे

बॉलिवूड अभिनेता इमरान खान आणि अवंतिका मलिक यांच्या लग्नाला जवळपास आठ वर्ष झाली आहे. लग्नाच्या आधी ते एकमेकांना जवळपास आठ वर्ष डेट करत होते. इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफला घेऊन नाही तर पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आला आहे. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार इमरान आणि अवंतिकामध्ये दुरावा आला आहे. सध्या अवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे. अवंतिका तिच्यासोबत मुलगी इमाराला सुद्धा घेऊन गेली आहे. इमरान- अवंतिकाचे कुटुंबीय आणि मित्र त्यांच्या वाद मिटवण्याचा प्रयत्न शर्थीने करतायेत.    


वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले इमरान एका शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करतोय. या शॉर्टफिल्मचे नाव ''मिशन मार्स : कीप वॉकिंग इंडिया'' आहे. अभिनेता इमरान खानने २००८ साली आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटापासून धमाकेदार सुरुवात केली होती. मात्र पहिल्या चित्रपटाव्यतिरिक्त त्याला फारसे यश मिळू शकले नाही. त्याचा शेवटचा चित्रपट ‘कट्टी बट्टी’त कंगना राणौतने मुख्य भूमिका केली होती.

केवळ ‘कट्टी-बट्टी’चं नाही तर इमरान खानच्या खात्यात फ्लॉप चित्रपटांची भरमार आहे. त्यानंतर अ‍ॅक्टिंगसोडून इमरानने आता दिग्दर्शनात हात आजमावयाचे ठरवले आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून अमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट महाभारतमध्ये इमरान खानची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. 


Web Title: Actor imran khan and his wife avantika malik parted ways
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.