नुसरत जहाँ पुन्हा चर्चेत, पतीसोबतचा बेडरूममधील रोमॅन्टिक व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:30 AM2020-01-15T11:30:37+5:302020-01-15T12:12:37+5:30

व्हिडीओमधील रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क

actor and mp nusrat jahan viral video with husband nikhil jain | नुसरत जहाँ पुन्हा चर्चेत, पतीसोबतचा बेडरूममधील रोमॅन्टिक व्हिडीओ झाला व्हायरल

नुसरत जहाँ पुन्हा चर्चेत, पतीसोबतचा बेडरूममधील रोमॅन्टिक व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देनिखिल जैनशी लग्न केल्यानंतर नुसरत यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सतत चर्चेत असतात. कधी सोशल मीडियावरचे फोटो तर कधी संसदेतील वक्तव्य अशा वेगवेगळ्या कारणांनी त्यांची चर्चा होते. सध्या नुसरत यांचा एक बेडरूम व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी निखील जैनसोबत लग्नगाठ बांधली होती. या डेस्टिनेशन वेडिंगची बरीच चर्चा झाली होती.  आता नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतचा बेडरुममधील एक रोमँटिक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नुसरत यांच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नुसरत आणि त्यांचा पती निखिल ‘हे शोना...’ या गाण्यावर अ‍ॅक्टिंग करताना दिसत आहेत. या ‘टिक टॉक’ व्हिडीओमधील या कपलची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांनी  हा व्हिडीओ लाइक केला आहे. 
 निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल  इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती.  कोलकाताचा प्रिसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा खुलासा त्यांनी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता.

लग्नानंतर नुसरत नवे फिल्म प्रोजेक्ट शिवाय खासदारकीच्या जबाबदा-यांत बिझी आहेत. नुसरत यांचे पती निखिल हेही त्यांच्या कामात बीझी आहेत. मात्र हे दोघंही त्यांच्या बिझी शेड्यूलमधून एकमेकांसाठी वेळ काढतात. नुसरत यांनी व्हेकेशनचे फोटो   सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या टिक-टॉकवरही सक्रिय आहेत.

निखिल जैनशी लग्न केल्यानंतर नुसरत यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. निखिल हिंदू तर नुसरत मुस्लिम असल्याने मुस्लिम धर्मगुरुंनी या लग्नाविरोधात फतवा काढला होता. तसेच भांग भरून  संसदेत गेल्यानेही नुसतर यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. या सर्व टीकेला उत्तर देताना, ‘मी दोन्ही धर्मांचा पुरेपूर आदर करते’ असे नुसरत म्हणाल्या होत्या.

Web Title: actor and mp nusrat jahan viral video with husband nikhil jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.