ताइक्वांडोचे ट्रेनिंग घेत आहे शाहरुखचा मुलगा अबराम, मिळाला 'येलो बेल्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:19 AM2019-08-28T11:19:04+5:302019-08-28T11:19:26+5:30

शाहरूख खान कुटुंबासह घालवलेला वेळेत तो ज्या अॅक्टिव्हीटी करत आहे. त्याचे तो अपडेट सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे.

AbRam gets yellow belt in Taekwondo from proud father Shah Rukh Khan. Watch video | ताइक्वांडोचे ट्रेनिंग घेत आहे शाहरुखचा मुलगा अबराम, मिळाला 'येलो बेल्ट'

ताइक्वांडोचे ट्रेनिंग घेत आहे शाहरुखचा मुलगा अबराम, मिळाला 'येलो बेल्ट'

googlenewsNext

सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. गेल्या काही वर्षांत शाहरूखचा मुलगा अबरामची खूप चर्चा व्हायची मात्र तैमुरच्या एंट्रीने सा-यांच्या नजरा फक्त तैमुर आणि तैमुरवरच असल्याचे पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा अबरामवर चर्चा होण्याचे कारण म्हणजे खुद्द शाहरूखने शेअर केलेला अबरामचा हा फोटो. या फोटोमध्ये मार्शल आर्ट यूनिफॉर्म घातलेला असून सध्या अबराम हा तायक्वांडोचे प्रशिक्षण घेत आहे. 'येलो बेल्ट' अबरामला मिळाला आहे. विशेष अबराम सगळ्यात जास्त पापा शाहरूखच्या जवळ आहे. 

नेहमी तो शाहरूख बरोबरच जास्त फिरताना पाहायला मिळतो.   तसेच  शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानानेही ताइक्वांडोचे ट्रेनिंग घेतले आहे. सध्या शाहरूख आपल्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. त्यामुळे कुटुंबासह घालवलेला वेळेत तो ज्या अॅक्टिव्हीटी करत आहे. त्याचे तो अपडेट सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. 

सुरुवातीला अबराम पप्पा शाहरूख सोबतच स्पॉट होत होता. आता तो शाहरूखशिवाय एकटाच फिरायला लागला. त्याचा हा अंदाज लोकांनाही आवडत असून, त्याचाही स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण होत आहे. वास्तविक अबराम शाहरूख खानची कार्बन कॉपी आहे. कारण शाहरूखप्रमाणेच त्याचाही अंदाज आहे. केवळ हेअरस्टाइलच नव्हे तर ब-याच बाबतीत अबराम पापा शाहरूखची कॉपी करताना बघावयास मिळतो. आता तो पुन्हा एकदा अशाच काहीशा अवतरात बघावयास मिळत आहे. 

Web Title: AbRam gets yellow belt in Taekwondo from proud father Shah Rukh Khan. Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.