ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क 12 किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 05:13 PM2021-01-06T17:13:33+5:302021-01-06T17:15:16+5:30

लीक झालेत सिनेमाच्या सेटवरचे फोटो

abhishek bachchan raised 12 kg weight for upcoming film bob biswas | ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क 12 किलो वजन

ओळखलंत का या अभिनेत्याला? सिनेमासाठी वाढवलं चक्क 12 किलो वजन

googlenewsNext
ठळक मुद्देनुकताच अभिषेक अ‍ॅमेझॉन प्राइमवरील सीरिज ब्रीद इन टू द शॅडोमध्ये दिसला होता. त्यानंतर नुकताच त्याचा ल्युडो चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

पहचान कौन? पहिल्या नजरेत या अभिनेत्याला ओळखणे कठीण आहे. सिनेमाच्या सेटवरचे फोटो लीक झालेत आणि हे फोटो पाहून सगळेच थक्क झालेत. अनेकजण या अभिनेत्याला ओळखू शकले नाहीत. या सिनेमासाठी या अभिनेत्याने एक दोन नाही तर चक्क 12 किलो वजन वाढवले. लॉकडाऊनदरम्यान वजन वाढवण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले. त्याचा हा लूक याच कष्टाचा परिणाम आहे. कुठल्याही प्रोस्थेटिकची मदत न घेता, या अभिनेत्याने आपल्या वाट्याची भूमिका साकारली. हा अभिनेता कोण तर ज्युनिअर बच्चन. होय, अभिषेक बच्चन.

‘बॉब बिस्वास’ या सिनेमात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो लीक झालेत आणि यातील अभिषेकला पाहून अनेकांना धक्का बसला. बॉब बिस्वासच्या भूमिकेसाठी वजन वाढवावे लागेल, ही पहिली अट होती. अभिषेकने ही अट स्वीकारली आणि लॉकडाऊनच्या काळात 12 किलो वजन वजन वाढवले. इतकेच नाही तर या सिनेमासाठी त्याने बंगाली भाषाही शिकला.

सिनेमात बॉब बिस्वासच्या आयुष्याची दु:खान्तिका दाखवली जाणार आहे. वाढलेल्या वजनासह अभिषेक या भूमिकेत अगदी फिट बसला.
2012 साली आलेला ‘कहानी’ हा विद्या बालनचा सिनेमा तुम्हाला आठवत असेल. यातले बॉब बिश्वास हे काल्पनिक पात्रही तुम्हाला आठवत असेल. याच पात्राची ही कथा आहे.

‘कहानी’मध्ये कॉन्ट्रॅक्ट किलरचे नाव बॉस बिस्वास होते. ही भूमिका श्वाश्वत चॅटर्जीने साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली होती. विशेषत: हत्येपूर्वी स्वत:ची ओळख करून देण्याची त्याची अनोखी त-हा अनेकांना भावली होती. अभिषेक बच्चन हेच पात्र सिनेमात जिवंत करणार आहे. दीया अन्नपूर्णा घोषने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात चित्रांगदा सिंह हिने नायिकेची भूमिका साकारली आहे.

नुकताच अभिषेक अ‍ॅमेझॉन प्राइमवरील सीरिज ब्रीद इन टू द शॅडोमध्ये दिसला होता. त्यानंतर नुकताच त्याचा ल्युडो चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. आता तो लवकरच बॉब बिस्वासमध्ये झळकणार आहे. 

Web Title: abhishek bachchan raised 12 kg weight for upcoming film bob biswas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.