ठळक मुद्देअभयने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो तमीळ चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. द हिरो या तमीळ चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यानेच ही माहिती सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

अभय देओलने इम्तियाज अलीच्या सोचा ना था या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या पहिल्या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने आहिस्था आहिस्था, हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., एक चालीस की लास्ट लोकल, जिंदगी ना मिलेगी दोबारा, देव डी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. आजवरच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला अभय नायकाच्या भूमिकेतच पाहायला मिळाला आहे. पण आता तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

अभयने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो तमीळ चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. द हिरो या तमीळ चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यानेच ही माहिती सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच द हिरो या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की, मी द हिरो या चित्रपटाच्या सेटवर असून या चित्रपटात मी एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. माझ्या करियरमध्ये मी आता एक वेगळी भूमिका साकारत आहे. आजवर मी नायकाच्या भूमिकेत झळकलो आहे. पण मी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. एक कलाकार म्हणून मी यासाठी खूपच खूश आहे. हा चित्रपट तमीळ भाषेतील असून एक नवीन भाषा, एक नवीन जागा... सगळेच काही माझ्यासाठी नवीन आहे. या चित्रपटाच्या टीमचा मी प्रचंड आभारी आहे. 

अभय देओल द हिरो या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन पीएस मित्रन करत आहेत. अभय गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात खूपच कमी काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची चॉपस्टिक ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या वेबसिरिजला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळाले होते. या वेबसिरिजमधील त्याची आणि मिथिला पालकरची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. अभयला या नव्या भूमिकेत देखील त्याचे फॅन्स स्वीकारतील अशी त्याला खात्री आहे.  


Web Title: Abhay Deol is excited to play villain in Tamil film 'Hero'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.