अबब! अक्षय कुमारने मानधनात केली इतक्या कोटींची वाढ, आकडा वाचून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 04:37 PM2021-01-29T16:37:46+5:302021-01-29T16:38:31+5:30

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा एकदा त्याच्या मानधनात वाढ केली आहे. आतापर्यंत तो एका सिनेमासाठी १२० कोटी रुपये मानधन घेत होता.

Abb! Akshay Kumar's honorarium increase of crores, the figure will be read | अबब! अक्षय कुमारने मानधनात केली इतक्या कोटींची वाढ, आकडा वाचून येईल भोवळ

अबब! अक्षय कुमारने मानधनात केली इतक्या कोटींची वाढ, आकडा वाचून येईल भोवळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक हिट सिनेमे रिलीज झाले आहेत. २०१९मध्ये अक्षयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ७०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर तो बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला होता. अक्षय कुमारच्या नावाचा फोर्ब्सच्या २०२०च्या यादीत समावेश झाला होता.
वृत्तानुसार, अक्षय कुमारने आता पुन्हा एकदा आपल्या मानधनात वाढ केली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमार आपल्या चित्रपटासाठी १२० कोटी रुपये मानधन घेत होता. मात्र आता त्याने त्याच्या मानधनात वाढ करत १३५ कोटी रुपये केले आहेत. चित्रपटाशी निगडीत दिग्दर्शकांचे म्हणणे आहे की, अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. लोक त्याच्या चित्रपटातील मेसेज आणि त्याच्या अभिनयाबाबत खूप उत्सुक असतात. ज्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतो. त्यामुळे अक्षयची टीमलादेखील वाटते की इतके मानधन घेण्याचा त्याचा हक्क आहे.


दिग्दर्शकांचे म्हणणे आहे की, अक्षयच्या नावाने बनलेल्या चित्रपटाचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. बॉलिवूडमधील जास्तीत जास्त निर्मात्यांना अक्षयसोबतच काम करायचे असते.

२०२१ मध्ये अक्षय कुमारचे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत. यात सुर्यवंशीपासून राम सेतू, रक्षा बंधन, बेलबॉटम, पृथ्वीराज चौहान, अतरंगी रे आणि बच्चन पांडे या चित्रपटांचा समावेश आहे.

Web Title: Abb! Akshay Kumar's honorarium increase of crores, the figure will be read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.