Aashiqui star Rahul Roy comeback in bollywood soon | बराच काळ बॉलिवूडपासून दुरावला होता हा अभिनेता, लवकरच करणार कमबॅक
बराच काळ बॉलिवूडपासून दुरावला होता हा अभिनेता, लवकरच करणार कमबॅक

१९९० साली रोमँटिक ड्रामा चित्रपट आशिकी आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटातून अभिनेता राहुल रॉय एका रात्रीत स्टार बनले होते. मात्र आशिकीनंतर राहुल रॉयने काही सिनेमांमध्ये काम केलं. पण, हवे तितके यश मिळू शकले नाही. त्यानंतर ते बॉलिवूडमधून गायब झाले. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल रॉय लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे आणि त्याने आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. 


दिग्दर्शक कनु बहलचा आगामी चित्रपट आगरामधून राहुलने कमबॅक करत आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आगरा चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर करत माहिती दिली. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, आशिकी स्टार राहुल रॉय, दिग्दर्शक कनु बहल यांच्या आगामी सिनेमा आगरामधून कमबॅक करणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत आणखीन कलाकार असणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग आग्रा व जवळपासच्या भागात होणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


दिग्दर्शक कनु बहल यांचा यापूर्वी तितली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शशांक अरोरा व रणवीर शौरी अभिनीत तितली चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले होते. त्यानंतर हा चित्रपट बऱ्याच नामवंत चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता आणि या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

आता राहुल रॉय बॉलिवूडमध्ये कमबॅक करत रसिकांच्या मनात घर करतो का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: Aashiqui star Rahul Roy comeback in bollywood soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.