आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 04:04 PM2020-11-16T16:04:39+5:302020-11-16T16:05:09+5:30

अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो.

Aaradhaya Bachchan 9th Birthday Amitabh Bachchan Shares Every Year Picture | आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

googlenewsNext

बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. 


आराध्या म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभि-ऐशची लाडकी लेक. आज नऊ वर्षाची झालीय. असं असलं तरी प्रेमळ आजोबांनी नातीवरील प्रेमापोटी यानिमित्ताने आराध्याचे आजोबा अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आराध्याच्या ९ व्या वाढदिवसाला बिग बी यांनी इन्स्टाग्रामवर आराध्याच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला. यात आराध्याच्ये नऊ फोटो एकत्र करुन तो फोटो शेअर केला आहे. पहिल्या वर्षापासून ते नवव्या वर्षांपर्यंतचे फोटो शेअर करुन त्यांनी आपले नातीबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो.

इतकेच नाही तर अमिताभनं आराध्याला 24 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार गिफ्ट दिली होती. त्यामुळं पहिल्या वाढदिवशी बेबी आराध्याची ऐश झाली होती. आता चाहत्यांना आराध्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर कधी शेअर होणार याची उत्सुकता  होती. आतापर्यंतच्या आराध्याच्या वाढदिवसाला मोठी बर्थडे पार्टी देण्यात आली आहे. यात बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी त्यांच्या मुलांसोबत मजा- मस्ती केली होती.

ट्विटरवरही अमिताभनं आराध्याला  वाढदिवसासाठी शुभेच्छा देणा-यांना धन्यवाद दिलेत.. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यामुळं चिमुकली आराध्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रतिक्रिया बिग बी ने दिलीय.
 

Web Title: Aaradhaya Bachchan 9th Birthday Amitabh Bachchan Shares Every Year Picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.