बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान त्याच्या भूमिका वास्तविक वाटण्यासाठी जी-तोड मेहनत घेत असतो. म्हणूनच त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असं संबोधलं जातं. आताचंच बघा ना... त्याच्या आगामी चित्रपटासाठी तो देशभरातील शंभर ठिकाणी शूटिंग करणार आहे. यासाठी खुद्द स्वतः तो जातीनं लक्ष घालतो आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, आमीर त्याच्या आगामी चित्रपटाचं भारतातील वेगवेगळ्या शंभर ठिकाणी चित्रीकरण करणार आहे. आमीरचा स्टुडिओ सेटअपवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे त्याने चित्रपटाच्या टीमला देशभरातील शंभर ठिकाणं शोधायला सांगितली आहेत. जिथे तो शूटिंग करू शकेल. दिल्ली, गुजरात, मुंबई, कोलकाता, बंगळूरू, हैदराबाद व इतर राज्यातील ठिकाणे शूटिंगसाठी निवड केली आहे.

यादरम्यान भारतातील अशी काही राज्य आणि ठिकाणी पहिल्यांदाच आमीर शूटिंग करणार आहे. अशाप्रकारे आमीर संपूर्ण देशात भ्रंमती करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला यावर्षाखेरीस सुरूवात होणार आहे. 


आमीर खानने आधी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माझ्या आगामी चित्रपट अंतिम रुप दिलं आहे. या चित्रपटाचं नाव लाल सिंग चड्ढा आहे. या चित्रपटाची निर्मिती वायकॉम १८ मोशन पिक्चर्स व आमीर खान प्रोडक्शन करत आहे.

लाल सिंग चड्ढा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गम्पचा रिमेक आहे. या चित्रपटात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता. या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन अद्वैत चंदन व लेखन अतुल कुलकर्णी करणार आहे.


आमीर खान लाल सिंग चड्ढा चित्रपटाची तयारी करतो आहे आणि या चित्रपटासाठी त्याने जवळपास वीस किलो वजन कमी केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला या वर्षाखेरीस सुरूवात होणार आहे.


Web Title: Aamir Khan Will Shoot Lal Singh Chaddha Film At 100 Location
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.