Aamir khan will get slim trim, know why he is so sure about this? | आमीर खान होणार स्लीम ट्रीम, जाणून घ्या त्याचा हा अट्टाहास नेमका कशासाठी?
आमीर खान होणार स्लीम ट्रीम, जाणून घ्या त्याचा हा अट्टाहास नेमका कशासाठी?

ठळक मुद्देआगामी सिनेमात आमीर दिसणार स्लीम ट्रीम

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमीर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटांकडून सगळ्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्यामुळे आमीरने आगामी प्रोजेक्ट्सची निवड काळजीपूर्वक करायचे ठरविले आहे. आता त्याच्याजवळ चार ऑफर्स असून त्यापैकी एकाची निवड केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्याच्या या सिनेमाची कथा जबरदस्त असेल पण त्यातील आमीरची व्यक्तिरेखा वेगळी असणार आहे. या सिनेमात तो स्लीम ट्रीम दिसणार आहे.

आमीरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, त्याचा पुढचा सिनेमा कोणता असेल, याचा निर्णय तो महिन्याभरात घेणार आहे. आता जरी चार चांगल्या पटकथा असल्या तरी अद्याप त्यापैकी कोणत्याही कथेवर आपण १०० टक्के लक्ष केंद्रित केलेले नाही. या सिनेमाची निर्मिती स्वतः आमीर करणार आहे.


सध्या आमीर त्यापैकी दोन सिनेमांबाबत विचार करतो आहे. दोन्हीमध्ये त्याचा रोल अगदी सडपातळ व्यक्तीचा असणार आहे. स्लीम होण्यासाठी आमीरने आपल्या आहारावर नियंत्रण आणायला सुरुवात केली आहे. आपल्या रोलला अनुसरून त्याने स्वतःचा डाएट प्लॅनदेखील केला आहे. आता तो नवीन प्लॅननुसार वर्कआऊटही करायला सुरुवात करणार आहे. त्याला स्वतःला अगदी सडपातळ स्थितीमध्ये बघायचे आहे. त्यासाठी तो देखील या नवीन रोलची आतुरतेने वाट बघतो आहे. 


तो हे सगळे १९९४ साली प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पच्या हिंदी रिमेकसाठी करत असल्याचे बोलले जात आहे. अद्याप आमीरने फॉरेस्ट गम्प चित्रपटाच्या रिमेकबाबत दुजोरा दिला नाही. मात्र या चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमीरला पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Aamir khan will get slim trim, know why he is so sure about this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.