aamir khan travelled economy class video goes viral | आमिर खानने फ्लाईटमध्ये असे केले काय की व्हायरल होतोय व्हिडीओ?
आमिर खानने फ्लाईटमध्ये असे केले काय की व्हायरल होतोय व्हिडीओ?

ठळक मुद्दे तूर्तास आमिर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात बिझी आहे. आमिरचा आगामी चित्रपट हा एका ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे.

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट आपटला आणि आमिर खानला मोठा धक्का बसला. पण आता आमिर हे अपयश विसरून नव्या दमाने कामला लागलाय. तूर्तास आमिरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. आता का? तर त्याचे उत्तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपसूक मिळणार आहे. होय, आमिरचा हा व्हिडीओ फ्लाईटमधला आहे. यात आमिर इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेला दिसतोय. आमिरसारखा इतका मोठा दिग्गज स्टार इकॉनॉमी क्लासने प्रवास करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचवेळी त्याच्या आजुबाजूला बसलेल्यांसाठी हा सुखद धक्का ठरला. सोशल मीडियावर याचमुळे आमिरचे कौतुक होतेय. अनेकजण आमिरच्या साधेपणाचे आणि विनम्रतेचे कौतुक करत आहेत.

आमिरचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘आमिर भाई, माशाअल्लाह, तू खरा हिरो आहेस’, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजरने ‘हा आमिरचा साधेपणा आहे,’ असे लिहित या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तूर्तास आमिर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात बिझी आहे. आमिरचा आगामी चित्रपट हा एका ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे नाव आहे, ‘फॉरेस्ट गम्प’. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे. ‘लाल सिंग चड्ढा’हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी सीक्रेट सुपरस्टार हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम केली होती.


Web Title: aamir khan travelled economy class video goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.