aamir khan opens up on his upcoming film after thugs of hindostan | ठग्स...नंतर चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे आमिर खान; अशी करतोय तयारी!!
ठग्स...नंतर चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे आमिर खान; अशी करतोय तयारी!!

ठळक मुद्दे‘महाभारत’ प्रोजेक्टबद्दल विचारले असता, या सगळ्या अफवा असल्याचे त्याने सांगितले.

आमिर खानसाठी गतवर्ष फार चांगले नव्हते. गतवर्षी आलेल्या त्याच्या ‘ठग्स  ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने सगळ्यांचीच निराशा केली. आमिरचा हा चित्रपट कधी नव्हे इतका दणकून आपटला. त्यामुळे ‘ठग्स  ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर काय घेऊन येणार, हे नवे वर्ष त्याच्यासाठी कसे ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ताजी बातमी खरी मानाल तर आमिर सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे.


होय, ताज्या मुलाखतीत आमिर यावर बोलला. मी सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे. चारही कथा अतिशय शानदार आहेत. यापैकी दोन कथांसाठी मला माझे वजन कमी करावे लागणार आहे. त्यामुळे मी खास डाएट सुरु केले आहे. या महिन्याच्या अखेरिस मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. पण या चारही कथांवर माझे समांतर काम सुरू आहे, असे आमिर या मुलाखतीत म्हणाला.


‘महाभारत’ प्रोजेक्टबद्दल विचारले असता, या सगळ्या अफवा असल्याचे त्याने सांगितले. मी महाभारतावर चित्रपट बनवतोय, ही अफवा कुणी व का पसरवली, मला ठाऊक नाही. मी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मी हा चित्रपट बनवणार असेल तर त्याचीही घोषणाही करेल, असे त्याने सांगितले.
‘ठग्स  ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्याचे खापर मी एकट्या दिग्दर्शकावर फोडणार नाही. मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम करतो, त्या सर्वांनाच सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवायचा असतो.पण कधी कधी प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरे उतरता येत नाही. मी एक टीम प्लेअर आहे. फ्लॉप चित्रपटासाठी माझा दिग्दर्शक जबाबदार असेल तर मी सुद्धा तितकाच जबाबदार आहे. मी दिग्दर्शकावर विश्वास ठेवून काम करतो. तो चुकला असेल तर मी सुद्धा चुकलोय आणि ही चूक मान्य करण्यात कुठलाही कमीपणा नाही. आपण सगळे चुकांमधूनचं शिकतो, असेही तो म्हणाला.

Web Title: aamir khan opens up on his upcoming film after thugs of hindostan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.