ठळक मुद्देइराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लाडकी लेक इरा खान सध्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटमध्ये इरा कमालीची ग्लॅमरस दिसतेय. शेअर  ‘Who Are You?’ असे कॅप्शन देत इराने या फोटोशूटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यात इरा बेली बटन पियर्सिंग, ड्रॉमेटिक मेकअप फ्लॉन्ट करताना दिसतेय. एका फोटोत इराने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे.


तूर्तास इराच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी ड्रीम गर्ल, ग्लॅमरस अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. इरा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव आहे. सोशल मीडियावर तिचे 70 हजारांवर फॉलोअर्स आहेत.


  काही दिवसांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

खुद्द इराने हा व्हिडीओ शेअर केला होता. यात व्हिडीओत इरा व मिशाल कपल डान्स करताना दिसले होते.

‘मला फक्त तुज्यासोबत डान्स करायचा आहे’, असे हा व्हिडीओ शेअर करताना इराने लिहिले होते.

इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. 


Web Title: aamir khan daughter ira KHAN crazy photoshoot viral ON socail media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.