ठळक मुद्देआमिरच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात बिझी आहे. 

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याच्याबद्दलची एक मोठी बातमी आहे. होय, ताजी चर्चा खरी मानाल तर आमिरने मुंबईत कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरने मुंबईच्या सांताक्रूज भागातील एसव्ही रोडवरची ३५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी खेरदी केली. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने खरेदी करण्यात आलेल्या या प्रॉपर्टीसाठी आमिरने २.१ कोटींची स्टँप ड्युटी भरली.

प्राईम प्लाजामधील दुस-या व तिस-या माळ्यावरचे दोन कमर्शिअल ब्लॉक आमिरने खरेदी केले आहेत.  याठिकाणी आमिर त्याचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. आमिर गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी जागेच्या शोधात होता.


आमिरच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात बिझी आहे. आमिरचा आगामी चित्रपट हा एका ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असेल. या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे नाव आहे, ‘फॉरेस्ट गम्प’. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे.  यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे.  

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली होती. गतवर्षी आलेला आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट दणकून आपटला होता. त्यामुळे ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाकडून आमिरला विशेष अपेक्षा आहेत.


Web Title: Aamir Khan buys property worth Rs 35 Crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.