आमीर खानने 'रॉकी भाई'ची मागितली माफी, कारण वाचून कराल आमीरचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:49 PM2021-11-24T15:49:21+5:302021-11-24T15:51:31+5:30

कोविडमुळे आमीर खानच्या (Aamir Khan) सिनेमाचं शूटींग सतत डिले होत होतं. यात आमीर खानसोबत करिना कपूरचीही मुख्य भूमिका आहे.

Aamir Khan apologies to KGF 2 producers and Yash says will promote KGF chapter 2 | आमीर खानने 'रॉकी भाई'ची मागितली माफी, कारण वाचून कराल आमीरचं कौतुक

आमीर खानने 'रॉकी भाई'ची मागितली माफी, कारण वाचून कराल आमीरचं कौतुक

googlenewsNext

बॉलिवूड स्टार आमीर खानने साऊथ सिनेमांचा सुपरस्टार यशची (Yash) माफी मागितली आहे. आमीर खानचा (Aamir Khan) सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) १४ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. याच दिवशी यशचा 'KGF Chapter 2' सिनेमाही रिलीज होणार आहे. दोन्ही सिनेमे क्लॅश केल्याने आमीर खान यशची माफी मागितली आहे.

यशच्या सिनेमाच्या निर्मात्यांनी 'KGF 2' ची रिलीज डेट आधीच फायनल करून ठेवली होती. आता आमीर खाननेही त्याचा सिनेमा त्याच दिवशी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आमीर खान याबाबत म्हणाला की, 'मी कधीही अशी तारीख निवडली नसती जी दुसऱ्या निर्मांत्यांनी आधीच ठरवली असेल. मात्र, मी या सिनेमात एका पंजाबी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आम्ही 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) बैसाखीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे'.

आमीरने यशची माफी का मागितली?

आमीर खान (Aamir Khan) म्हणाला की, 'ही घोषणा करण्याआधी मी KGF 2 चे निर्माते आणि अभिनेता यशची माफी मागितली आहे. मी त्यांना समजावलं की, 'लाल सिंह चड्ढा' च्या रिलीजसाठी १४ एप्रिल परफेक्ट तारीख का आहे. त्यांनी माझं म्हणनं समजून घेतलं आणि माझ्या बोलण्याला सहमती दर्शवली'. आमीर खानचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

कोविडमुळे आमीर खानच्या सिनेमाचं शूटींग सतत डिले होत होतं. यात आमीर खानसोबत करिना कपूरचीही मुख्य भूमिका आहे. ठग्स ऑफ हिंदोस्ताननंतर आमीरचा एकही सिनेमा रिलीज झालेला नही. अशात हे बघणं महत्वाचं ठरेल की, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय कमाल करेल.
 

Web Title: Aamir Khan apologies to KGF 2 producers and Yash says will promote KGF chapter 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.