Aamir had made fun of Juhi during the shooting of 'Ishq'. | 'इश्क'च्या शूटिंगवेळी आमिरने जुहीची केलेली मस्करी आली होती अंगाशी, कित्येक वर्षे एकमेकांशी धरला होता अबोला

'इश्क'च्या शूटिंगवेळी आमिरने जुहीची केलेली मस्करी आली होती अंगाशी, कित्येक वर्षे एकमेकांशी धरला होता अबोला

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावला यांनी एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होती. १९८८ साली रिलीज झालेल्या कयामत से कयामत या चित्रपटात त्या दोघांनी धमाल केली. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर ही जोडी अनेक चित्रपटात काम करताना दिसली. मात्र इश्क चित्रपटानंतर रुपेरी पडद्यावर दोघं कधीच एकत्र दिसले नाहीत.

नुकतेच इश्क चित्रपट रिलीज होऊन २३ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९९७ साली रिलीज झाला होता. हिट झालेल्या या सिनेमात अजय देवगण आणि काजोल यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

जेव्हा इश्क चित्रपटाचे शूटिंग सुरू होते तेव्हा सेटवर आमिरने जुहीची मस्करी केली ज्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेटवर आमिरने जुहीचा हात मागितला आणि म्हणाला, त्याला ज्योतिष माहिती आहे. जुहीनं हात देताच आमिर थुंकला. यामुळे जुही खूप नाराज झाली होती. तिला आमिरची अशी मस्करी अजिबात आवडली नव्हती.

जुहीला याचा एवढा राग आला होता की, ती चित्रपट सोडायलाही तयार होती. मात्र नंतर कसेतरी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. शुटींग दरम्यान दोघे एकमेकांपासून दूर रहात होते. ५ वर्षे असेच चालू राहिले. ते एकमेकांशी बोलले देखील नाही. नंतर गोष्टी बदलल्या आणि दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. मात्र या घटनेनंतर दोघांनी कधीच एकमेकांसोबत चित्रपटात काम केले नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aamir had made fun of Juhi during the shooting of 'Ishq'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.