आली परमसुंदरी..!, क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट 'मिमी'मधील पहिलं गाणं झालं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:58 PM2021-07-16T17:58:48+5:302021-07-16T17:59:22+5:30

अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Aali Paramasundari ..!, The first song of Kriti Sannon's upcoming film 'Mimi' has been released | आली परमसुंदरी..!, क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट 'मिमी'मधील पहिलं गाणं झालं रिलीज

आली परमसुंदरी..!, क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट 'मिमी'मधील पहिलं गाणं झालं रिलीज

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता चित्रपटातील पहिले गाणे परम सुंदरी रिलीज झाले आहे. या गाण्यात क्रिती सनॉन दमदार ठुमके लगावताना दिसते आहे. 
क्रिती सनॉनने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट मिमीमधील पहिले गाणे परम सुंदरी शेअर केले आहे. तिने हे गाणे शेअर करत लिहिले की, परम सुंदरी येथे आहे. मिमी फुल फॉर्ममध्ये आहे. चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर ३० जुलैला रिलीज होणार आहे.


या गाण्यात क्रिती सनॉनचे जबरदस्त मुव्ह्ज पहायला मिळत आहेत.तिच्या या गाण्याला खूप पसंती मिळते आहे. तिच्या या गाण्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहेत. 


मिमी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या ट्रेलरमधील क्रितीचा अभिनय आणि पंकज त्रिपाठीची कॉमेडीचे खूप कौतुक होत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वजण चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स पाहून क्रिती सनॉन म्हणाली की, हे खूप दमार आहे की मी शब्दांत आनंद व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी हा चित्रपट खूप स्पेशल आहे. मिमीने माझ्या स्वतःमध्ये बरेच इमोशन्स शोधण्यासाठी मदत केली आहे. आता ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांकडून जे प्रेम मिळते आहे आणि टीमचे एवढे कौतुक होत आहे, हे पाहून मी खूप खूश आहे.

Web Title: Aali Paramasundari ..!, The first song of Kriti Sannon's upcoming film 'Mimi' has been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.