ठळक मुद्देटीना या भूमिकेसाठी रवीना टंडन, उर्मिला मातोंडकर, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन, करिश्मा कपूर, ट्विंकल खन्ना, तब्बू या अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. पण या अभिनेत्रींनी नकार दिल्यामुळे ही भूमिका राणी मुखर्जीला मिळाली.

कुछ कुछ होता है या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच सलमान खान देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. विशेष म्हणजे करण जोहरने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. 

कुछ कुछ होता है या चित्रपटात काजोलने अंजली ही व्यक्तिरेखा तर राणीने टीना ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्राचा तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटातील टीनाचा रोल अनेक अभिनेत्रींना ऑफर करण्यात आला होता. पण या अभिनेत्रींनी विविध कारणांमुळे या चित्रपटासाठी नकार दिला होता. अमर उजाला या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार कुछ कुछ होता है या चित्रपटात काम करण्याविषयी तब्बल सात अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. पण त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. 

टीना या भूमिकेसाठी रवीना टंडन, उर्मिला मातोंडकर, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन, करिश्मा कपूर, ट्विंकल खन्ना, तब्बू या अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. पण या अभिनेत्रींनी नकार दिल्यामुळे ही भूमिका राणी मुखर्जीला मिळाली. टीना या भूमिकेसाठी करणची पहिली पसंती ट्विंकल खन्नाला होती असे करणनेच अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. राणीने या चित्रपटाआधी केवळ राजा की आयेगी बरात या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट चालला नसला तरी या चित्रपटातील राणीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 

कुछ कुछ होता है या चित्रपटामुळे तर राणी मुखर्जीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिचा लूक, तिचा अभिनय सगळे काही प्रेक्षकांना आवडला होता. 


Web Title: 7 Bollywood Actresses Rejected Karan Johar Offer For Film Kuch kuch hota hai?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.