लग्न करताच विरुष्का झाले ६०० कोटींचे मालक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 08:44 AM2017-12-12T08:44:26+5:302017-12-12T14:14:50+5:30

क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांत दिग्गज असलेल्या विराट-अनुष्का लग्न करताच सहाशे कोटींचे मालक झाले आहे. वाचा सविस्तर!

600 crore people own business after marriage! | लग्न करताच विरुष्का झाले ६०० कोटींचे मालक!!

लग्न करताच विरुष्का झाले ६०० कोटींचे मालक!!

googlenewsNext
रतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतेच इटलीतील एका सुंदर डेस्टिनेशनवर लग्न केले. अतिशय देखण्या अशा या लग्नसोहळ्याकडे त्यांच्या जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून होते. आता हे दाम्पत्य लवकरच मुंबई येथे शानदार रिसेप्शन देणार असून, त्यासाठी क्रिकेटसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. असो, या दोघांच्या व्यावसायिक जीवनाविषयी सांगायचे झाल्यास, दोघेही त्यांच्या-त्यांच्या फिल्डमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत. त्यामुळे या दोघांची कमाईदेखील प्रचंड आहे. जाहिरात क्षेत्रात तर दोघांचीही प्रचंड मागणी असल्याने आगामी काळात हे दोघे एकत्र आल्यास त्यांची व्हॅल्यू दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, विराट आणि अनुष्काच्या प्रॉपर्टीविषयी समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, या दाम्पत्य लग्नानंतर सहाशे कोटी रूपयांपेक्षा अधिक संपत्तीचे मालक बनले आहेत. सध्या विराट ३९० कोटींचा मालक असून, अनुष्काची २२० कोटी इतकी संपत्ती आहे. अशात हे दोघे एकत्र आल्याने त्यांची संपत्ती सहाशे कोटींच्यावर गेली आहे. २००८ मध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अनुष्का सध्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीमधील तिन्ही खानसोबत काम केले असून, यांच्यासोबतचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीत अनुष्काची व्हॅल्यू अधिक आहे. अनुष्का तिच्या एका चित्रपटासाठी पाच कोटी रूपये फिस आकारते. शिवाय जाहिरातीसाठीदेखील ती अशाच स्वरूपाची तगडी रक्कम स्वीकारते. वर्षाकाठी केवळ जाहिरातींमधून ती चार कोटी रूपये कमाविते. अनुष्काचे एक फिल्म प्रॉडक्शन हाउस असून, त्यामधूनही तिची कमाई तगडी आहे. 
 

विराटबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो भारतीय क्रिकेट संघातील टॉप खेळाडूंपैकी एक आहे. शिवाय त्याच्यावर कर्णधारपदाची धुरा असतानाही त्याचा जबरदस्त खेळ पाहता त्याची जाहिरात क्षेत्रात प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये विराट यावर्षी सातव्या क्रमांकावर आहे. विराटचा सध्याचा खेळ पाहता जगातील अनेक रेकॉर्ड तो मोडत आहे. त्यामुळे त्याला क्रिकेटमधून मिळणारी रक्कम प्रचंड आहे. त्याचबरोबर आयपीएलकरिता त्याला तब्बल १४ कोटी रूपये मिळतात. आता हे दोघे एकत्र आल्याने आगामी काळात यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल यात शंका नाही. 

Web Title: 600 crore people own business after marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.