Navratri : शारदा खाडे मी दुर्गा : कोरोनाला हरवून बजावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:23 PM2020-10-19T14:23:06+5:302020-10-19T14:25:53+5:30

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनारुपी महासंकट लोकांच्या डोक्यावर येऊन बसलेले आहे. आपले शासन तसेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सजग राहून ...

Navratri: I Durga: | Navratri : शारदा खाडे मी दुर्गा : कोरोनाला हरवून बजावले कर्तव्य

Navratri : शारदा खाडे मी दुर्गा : कोरोनाला हरवून बजावले कर्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देNavratri : मी दुर्गा कोरोनाला हरवून बजावले कर्तव्य

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनारुपी महासंकट लोकांच्या डोक्यावर येऊन बसलेले आहे. आपले शासन तसेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सजग राहून गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीत लोकांचा जीव वाचावा, या हेतूने अक्षरश: जिवाचे रान करताना पहायला मिळाले. सातारा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शारदा पंढरीनाथ खाडे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर तसेच कर्तव्यतत्पर राहून आठ महिन्यात एकही सुट्टी न घेता सेवा बजावली.

जिल्ह्यात २२ मार्चला जनता कर्फ्यू लागला, त्यानंतर २४ मार्चपासून प्रशासनानं लॉकडाऊन घोषित केला. सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी येऊन पडली. प्रशासकीय यंत्रणा अतिशय सहजतेने उभी राहिली. सजग राहून लोकांना प्रबोधन करण्यावर या यंत्रणेने भर दिला. लॉकडाउनमध्ये तालुक्यात जे बेघर मजूर तसेच ऊसतोड कामगार होते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवण्याचे नियोजन शारदा खाडे यांनी केलं.

खावली येथील कोविड सेंटरवर कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावने, सेंटरवर काय हवं नको ते पाहणं हे चालू होतं, तेव्हाच जे परप्रांतीय मजूर आपल्या सातारा तालुक्यात अडकून पडले होते. ज्यांना प्रशासनाने यशोदा टेक्निकल इन्स्टिट्यूट याठिकाणी राहण्याची सोय केली होती, अशा साडेचार हजार परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती. अशा मजुरांना एसटी तसेच रेल्वे गाड्यांचे बुकिंग करून अतिशय नियोजनपूर्वक त्यांची पाठवणी केली.

त्यानंतर पानमळेवाडी येथे ऑगस्टमध्ये नवीन कोविड सेंटर सुरू झालं, येथेही योग्य उपायोजना करण्यावर खाडे यांनी भर दिला. मात्र, या साऱ्या धावपळीत त्याच कोरोनाबाधित झाल्या. आठ महिन्यात एकही सुट्टी न घेता अविरतपणे कार्यरत राहिल्यानंतर कोरोनामुळे त्यांना घरी थांबणे भाग पडले. मात्र घरी राहून देखील त्यांनी आपले कर्तव्य थांबवले नाही. त्यांना पती व मुलांची चांगली साथ लाभली. मुलांनी स्वतः स्वयंपाकाची जबाबदारी घेतली. गृह विलगीकरणआत राहून खाडे यांनी कोरोनावर मात केली. मात्र कोरोना आजार त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेला थांबवू शकला नाही


नाव : शारदा पंढरीनाथ खाडे
नोकरी : नायब तहसीलदार, सातारा
मोबाईल क्रमांक : ९८८१८५४८७५



कोरोना या वैश्विक महामारीशी सर्वसामान्य जनता लढा देत होती. या जनतेला कुठलीही तोशीस लागू नये, या हेतूने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवून झपाटून काम केले आहे. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर यांनी प्रत्येकावर नियोजनपूर्वक जबाबदारी दिली. मी ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
- शारदा खाडे, नायब तहसीलदार



नोंद घेण्याजोगे कार्य :

लॉकडाऊनच्या काळात झपाटून काम केले
 एप्रिल ते सप्टेंबर रजाच काय आठवड्याची सुट्टी देखील घेतली नाही
 लॉकडाऊनच्या काळामध्ये बेघर कुटुंबापर्यंत अन्नधान्य पुरविण्याचे नियोजन
 खावली आणि पानमळेवाडी येथील कोविंड सेंटरवर नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत
 साडेचार हजार परप्रांतीय मजुरांना नियोजनपूर्वक गावी पाठवले
 स्वतः कोरोनाबाधित होऊन देखील होम कोरंटाईइन होऊन प्रशासकीय कामकाजात सहभाग

Web Title: Navratri: I Durga:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.