Dil-e-Nadaan : तो अन् ती डबलसीट... मॅरेज अॅनिव्हर्सरी सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 05:54 PM2018-03-24T17:54:20+5:302018-03-24T18:02:58+5:30

प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं नवंकोरं, टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)

first Marriage anniversary special celebration | Dil-e-Nadaan : तो अन् ती डबलसीट... मॅरेज अॅनिव्हर्सरी सुपरहिट

Dil-e-Nadaan : तो अन् ती डबलसीट... मॅरेज अॅनिव्हर्सरी सुपरहिट

Next

- कौस्तुभ केळकर नगरवाला.

तो ऑफबीट.
काहीतरी हटके.
दरवेळी.
लग्नाचा पहिला वाढदिवस.
महाबळेश्वरला सेलिब्रेट करायचा.
पहिलं वर्ष भुरूभुरू उडून गेलंलं.
अजून पुरती ओळख पटलीच नव्हती.
दोन्ही बॅटस्मन जस्ट सेट होत होते.
सांभाळून घ्यायचे दिवस.
झाल्या काही चुका.
त्याही डायबेटीशी गोड वाटतात.
सहज पोटात घेतल्या जातात.
फ्युचरचा फारसा विचार नव्हता.
प्रेझेंट भरभरून जगला जात होता.
टेन्स काहीच नव्हता.
बस..
प्यार ही प्यार.
हेच सगळ्यात डेंजरस.
पहिल्या वर्षी फक्त डोळेच बोलतात.
फारसं बोललं नाही, तरी फरक नही पडता.
नंतर मात्र मोकळं व्हायला हवं.
संवाद हवा.
वाद नको.
एकमेकांच्या बाऊंड्रीज क्लिअर करायल्या हव्यात.
स्ट्रेन्ग्थ माहिती हवी.
वीकनेस माहिती पाहिजे.
खरी ओळख पटायला हवी.
नाहीतर ,
हळूहळू एकमेकांना गृहित धरलं जाणार.
एक्स्पेक्टेशन्स वाढणार.
दरवेळी त्या पुऱ्या करणं अवघड.
अॅम्बीशन्स.
ईगोज.
मग कुरकुरे..
अबोला.
रुसवा.
अन् म्युच्युअल अन्डस्टँडीगचा बट्ट्याबोळ.
पुअर रनिंग बिटवीन दी विकेटस्.
आपणच आपल्या पार्टनरला, रनआऊट करायचं.
खोटं हसत टाळ्या पिटायच्या.
अशी टीम कदाचित हरणार नाही.
पर, जितने का मजा ?
कभ्भी नही.
वो ये सब जानता था.
म्हणूनच त्यानं ठरवलेलं.
दर वर्षी लग्नाचा वाढदिवस हटके साजरा करायचा.
आनंदाची एफडी मॅच्युअर करायची.
नवे प्लॅन्स.
नव्या पॉलिसीज.
वाढत्या सुखाची अमाउंट, पुन्हा वर्षभरासाठी इन्व्हेस्ट करायची.
आदल्या दिवशी रात्री घरी पोचायला त्याला जरा उशीरच झाला.
आला.
जेवला.
"पटकन् बॅग भर.."
त्याची सायकल.
गाडीच्या टपावर.
अकरा वाजता निघाले सुद्धा.
पहाटे पहाटे.
वेलकम टू महाबळेश्वर.
रूम ताब्यात घेतली.
पटकन् फ्रेश झाले.
"चल फिरायला जायचंय..."
ती छान तयार झाली.
फरवाला गुलाबी फुलोरी स्वेटर.
गोंड्याची सांताक्लॉजसारखी टोपी.
टोपीखालनं उगवणारे तिचे लांबसडक मोकळे केस.
हातात पांढरे मुलायम ग्लोव्हज.
त्याने पण मस्त पांढरा शुभ्र स्वेटर घातलेला.
गळ्यात चेक्सी मफलर.
एकदम रूषी पकूर.
हुडहुडी थंडी.
" गाडी काढ ना.."
त्यानं सायकल काढली.
ती खिदळली.
पटकन मधल्या बारवर बसली.
त्यानं पॅडेलींग सुरू केलं.
धुंद गुलाबी हवा.
त्याच हवेनं सायकलची टायर्स टम्म फुगलेली.
गर्द हिरवे डोंगर.
तांबडा रस्ता.
वळणावळणानं जाणारा.
दमसासाची परीक्षा घेणारा चढ.
त्याला त्याचं काहीच वाटलं नाही.
दमदार वाटचाल.
ती पुढ्यात.
तिच्या अस्तित्वाचा वास.
तिच्या केसातून त्याच्या नाकाला गुदगुल्या करत होता.
मधेच तो रस्ता सोडून तिच्या डोळ्यात बघायचा.
रस्ता लवकर संपवणाऱ्या मंदधुंद गप्पा.
साठवून ठेवलेल्या.
न संपणाऱ्या.
रस्ता कितीही अवघड असू देत.
तेरा साथ है ना..
तुझ्यासाठी काय पण.
पहिला टप्पा पार पडला.
तो घामाघूम.
मग मात्र ओझं वाटाया लागलं.
जिवलगा, जड झाले ओझे.
झेपत नसताना कशाला ऊगा दमछाक?
ती खरी हमसफर.
टुणकन् उडी मारून खाली उतरली.
एका हातात सायकल.
एका हातात ती.
यूँही कट जायेगा सफर साथ चलने से..
की मंजील आयेगी नजर..
खरंच तो अवघड रस्ता संपला.
बुट्टेवाला.
वन बाय टू.
लाईफ पार्टनर्सनी, पार्टनरशीपमधे खाल्ला.
आता सरळसोट रस्ता.
ती पुन्हा याच्या पुढ्यात.
कधी कधी, सरळसोट रस्ताच घात करतो.
अचानक फुस्स.
सायकल पंक्चर.
पुन्हा जोडीनं मॉर्निंग वॉक.
पंक्चरवाला शोधला.
पंक्चर काढलं.
कधीतरी अडचणी येणारच.
पण आपण चालत राहायचं.
हम साथ साथ है !
नव्यानं हवा टायरमधे.
नवा जोश.
नवा उत्साह.
आता मात्र तीव्र उतार.
कुठली तरी कटू आठवण.
सायकलनं घेतलेला वेग.
बसू लागलेले हादरे.
गप्पांचं भांडण.
कचाकचा भांडणारी दोघं.
आँखों में उतरा हुवा खून 
नजर हटी.
दुर्घटना घटी.
एका वळणावर आऊट ऑफ कंट्रोल.
बॅलन्स जातो.
ती पडणार.
जोरात आपटणार.
तो सायकल सोडून देतो.
हातांच्या टोपलीत, तिला अलगद कॅच करतो.
डोळ्यात डोळे.
खऱ्या प्रेमाची साक्ष पटते.
भांडण दरीत पडून मरून जातं.
रमत गमत, जोडीनं दोघं हॉटेलवर परत येतात.
डबलसीट.
मस्त प्रवास.
प्रेम , भांडण, पंक्चर , पडणं, सबकुछ.
हलका हलका एहसास.
खुला आसमाँ.
हसी वादीयाँ.
मजा आली.
पहिल्या वाढदिवसाचं भारी सेलिब्रेशन.
दोघं ब्रेकफास्ट मागवतात.
पुन्हा एकदा घास भरवाभरवी.
मनापासून.
दोनो कसम खाते है , ब्रेकफास्टबरोबर.
"कुछ भी होने दो,
साथ नही छोडने का.
रिश्तोंकी साईकलपें डबलसीट जाने का."
एकदम ती जीभ चावते.
"जानू , नेक्स्ट इयर डबलसीट नही जमेगा.
पुढच्या वर्षी सायकल नको, बाबागाडी हवी."
स्वारी खुश.
अन् पुढे...
हॅपी जर्नी.

रेखाचित्रः अमोल ठाकूर

Web Title: first Marriage anniversary special celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.