इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:20 AM2019-01-18T10:20:39+5:302019-01-18T10:37:28+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय- बुुध्दिमत्ता चाचणी, या घटकमध्ये - तर्कसंगती व अनुमान - इतर, तुलना, कालमापन, घटना, कमी-जास्त, पदावली, विधाने-अनुमान यावर आधारित प्रश्न असतात.

Etc. 5th scholarship test-related subject-intelligence test element - logic and estimation - others | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -लेख क्र. 17विषय- बुुध्दिमत्ता चाचणी घटक - तर्कसंगती व अनुमान -  इतर

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय- बुुध्दिमत्ता चाचणी, घटक - तर्कसंगती व अनुमान - इतर

महत्त्वाचे मुद्दे -

  •  यामध्ये तुलना, कालमापन, घटना, कमी-जास्त, पदावली, विधाने-अनुमान यावर आधारित प्रश्न असतात.
  • तुलना करताना आकृत्या, रेषा किंवा , अशी चिन्हे वापरून, उदाहरणे सोडवावे.
  • पर्यायातील उत्तरांशी नकारात्मक पध्दतीने पर्याय कमी करून तुलना करावी
  •  घटनांचा क्रम/ तुलना समजण्यासाठी तक्ता तयार करावा.
  •  घड्याळाच्या बाबतीत योग्य निरीक्षण असावे.
     

नमुना प्रश्न -

(1) रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? (2017)
(1) त्रिकोण (2) वर्तुळ (3) चौकोन (4) आयत
स्पष्टीकरण - वरील प्रश्न प्रथम व्यवस्थित वाचावा. त्यानंतर शेवटी प्रश्न काय आहे? तर जीवा वर्तुळ आकृतीत असते, म्हणून वर्तुळाला काय म्हटले आहे. वर्तुळाला आयत म्हटले आहे. म्हणून आयत पर्याय क्र. 4 बरोबर आहे.

(2) हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे?
(1) वाघ (2) ससा (3) हत्ती (4) सिंह
स्पष्टीकरण- आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. म्हणून वाघाला काय म्हटले आहे-ससा म्हणून पर्याय क्र. 2 बरोबर आहे.

(3) कार्तिकी ही शाल्मलीपेक्षा उंच आहे. अनुजा ही कार्तिकीपेक्षा उंच आहे. वेदिका ही अनुजापेक्षा उंच आहे. तर सर्वांत उंच कोण आहे ?
(1) कार्तिकी (2) अनुजा (3) शाल्मली (4) वेदिका
स्पष्टीकरण- सर्वात उंच कोण हे रेषेद्वारे पाहुया.

  • कार्तिकी   .....
  • शाल्मली  ...      
  • अनुजा     ........ 
  • वेदिका     .........

म्हणून सर्वात उंच वेदिका आहे.
उत्तर- पर्याय क्र. 4

(4) पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत मागे घोडा पळत होता. वाघ व ससा यांच्यामध्ये गाढव पळत होते, तर सर्वात शेवटी कोण पळत होते?
(1) ससा (2) घोडा (3) वाघ (4) हत्ती
स्पष्टीकरण- सर्वात शेवटी म्हणजेच सर्वात मागे घोडा आहे.
पर्याय क्र. - 2 उत्तर

(5) एका खोलीत पांढरा, हिरवा, निळा, काळा, लाल या क्रमाने 85 रंगाचे डबे ठेवले आहेत, तर 37 व्या क्रमांकावर कोणत्या रंगाचा डबा येईल?
(1) हिरवा (2) पांढरा (3) लाल (4) काळा
स्पष्टीकरण - एकूण रंग- 5 पांढरा, हिरवा, निळा, काळा, लाल या क्रमाने आहेत.
37 व्या क्रमांकावरील रंगाचा डबा ओळखण्यासाठी 5 ने 37 ला भागले असता बाकी - 2 राहते. म्हणून 2 क्रमांकावरील रंगाचा डबा हिरवा हाच 37 व्या रंगाचा डबा आहे.
उत्तर- पर्याय क्र. 1

नमुना प्रश्न -


(1) घड्याळ्यात मिनिट व तास काट्यांत काटकोन किती वेळा तयार होतो ?
(1) एक (2) दोन (3) तीन (4) चार

(2) प्रसाद हा पार्थपेक्षा उंच आहे. तन्मय हा प्रसादपेक्षा उंच आहे. चिन्मय हा अथर्वपेक्षा उंच आहे. पार्थ हा चिन्मय व अथर्वपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे ?
(1) पार्थ (2) चिन्मय (3) प्रसाद (4) तन्मय

(3) आंब्याला कारले म्हटले, कारल्याला चिंच म्हटले, चिंचेला मीठ म्हटले, मिठाला पेरू म्हटले, पेरूला जांभूळ म्हटले तर
(1) आंब्याची (2) कारल्याची (3) चिंचेची (4) पेरूची

(4) चाचणीत संदेशला केतनपेक्षा जास्त मात्र दीप्तीइतके गुण मिळाले नाहीत. केतनला पवनइतकेच पण श्वेतापेक्षा जास्त गुण मिळाले. सत्यमला श्वेतापेक्षा 2 गुण कमी मिळाले. तर सर्वात जास्त गुण कोणाला आहे मिळालेत?
(1) संदेश (2) केतन (3) दीप्ती (4) श्वेता

(5) अलिया व स्वालियाला गणित विषय आवडतो. गायत्री व अथर्वला विज्ञान विषय आवडतो. स्वालिया व श्वेताला इंग्रजी, तर गायत्री व अलियाला हिंदी विषय आवडतो. चित्रकला विषय फक्त स्वालियाला आवडतो, तर सर्वांत जास्त विषय कोणाला आवडतात?
(1) स्वालिया (2) गायत्री (3) अलिया (4) अथर्व

(6) टीव्हीला मिक्सर म्हटले, मिक्सरला संगणक म्हटले, संगणकाला मोबाईल म्हटले, मोबाईलला रोडिओ म्हटले, तर व्हॉटस् अपद्वारे मेसेज कशाने पाठवता येईल?
(1) मोबाईल (2) रोडिओ (3) मिक्सर (4) संगणक

(7) सांगलीतील चित्र प्रदर्शनात वाघ, सिंह, ससा, घोडा, चित्ता, गाय अशा प्राण्यांची क्रमाने 210 चित्रे भिंतीवर लावलेली आहेत, तर 168 व्या क्रमांकावर कोणाचे चित्र येईल?
(1) वाघ (2) ससा (3) गाय (4) यापैकी नाही

(8) खरशिंग शाळेत बाल आनंद मेळावा सोमवारपासून पाच दिवस विविध खेळ स्पर्धेने होणार होते. मेळाव्याची सुरूवात क्रीडा स्पर्धेने झाली, तर तिसऱ्या दिवशी निबंध स्पर्धा होत्या आणि शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. इतर दिवशी चित्रकत्रा व फनी गेम्स स्पर्धा झाल्या. तर फनी गेम्स कोणत्या वारी झाल्या?
(1) सोमवार (2) बुधवार ( 3) शुक्रवार (4) मंगळवार

(9) शाळेत इ. 3 री च्या वर्गात मॅडमनी भिंतीवर अनुक्रमे गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू यांची एकूण 125 चित्रे लावली आहेत, तर 56 व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल?
(1) गुलाब (2) जास्वंद ( 3) मोगरा (4) झेंडू

(10) रायगडला प्रतापगड म्हटले, प्रतापगडाला तोरणागड म्हटले, तोरणागडाला राजगड म्हटले, राजगडाला पुरंदर किल्ला म्हटले स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती?
(1) प्रतापगड (2) रायगड ( 3) तोरणागड (4) राजगड

उत्तरसूची - (1) 2 (2) 1 ( 3) 3 (4) 1 (5) 1 (6) 2 ( 7) 3 (8) 3 (9) 4 (10) 1

संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th scholarship test-related subject-intelligence test element - logic and estimation - others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.