इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 02:49 PM2019-01-04T14:49:59+5:302019-01-04T14:52:55+5:30

कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानांवरून ठरवली जाते.

Etc. 5th scholarship test - face price of locales, local price, extended layout | इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - लेखमालिका क्र. 3अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा  : लेखमालिका क्र. 3 : महत्त्वाचे मुद्दे

अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

१) कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानांवरून ठरवली जाते.
अब्ज             दशकोटी       कोटी          दशलक्ष    लक्ष     दशहजार   हजार       शतक      दशक    एकक
०००००००००  ००००००००    ०००००००   ००००००  ०००००  ००००        ०००             ००           ०

२) कोणत्याही संख्येतील अंकांची दर्शनी किंमत त्या अंकाएवढीच असते.
उदा. : २५३७४५ मध्ये ५ या अंकाची दर्शनी किंमत ५ च आहे.

३) एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानांवर समान अंक असेल, तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकांच्या नऊ पट असतो.
उदा. : ४५२७७ या संख्येतील दशक व एकक स्थानी ७ अंक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक (७०-७) = ६३ म्हणजेच ९ ७ ७ = ६३

४) कोणतीही संख्या तिच्या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या बेरजेच्या मांडली असता त्या संख्येचे विस्तारीत रुपात लेखन होते.

सोडविलेली उदाहरणे -
(१) ५,४५,०३५ या संख्येतील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती?

(१) ३९९९० (२) ३९००० (३) ३९९७० (४) ३९७७०

स्पष्टीकरण - ५,  ४५,  ०३५
                        -    -
किंमत -  ४००००  ३०  यांच्या किंमतीतील फरक
४०००० - ३० = ३९९७० म्हणजेच पर्याय क्र. ३ बरोबर

२) ८३४९३०० या संख्येतील ३ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
(१) ० (२) २९९७०० (३) २९७७०० (४) २९९०७०

स्पष्टीकरण - ८३४९३००
फरक
३००००० - ३०० = २९९७००
लक्ष        शतक
पर्याय क्र. ३ बरोबर

३) ६८५२५२४ या संख्येमध्ये दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखीच असणारा अंक कोणता?
(१) २ (२) ५ (३) ८ (४) ४

स्पष्टीकरण - ६८५२५२४ या संख्येतील दर्शनी किंमत व स्थानिक किंमत सारखी असणारा अंक ४ आहे. कारण ४ ची दर्शनी किंमत ४ व स्थानिक किंमत एककस्थानी स्थानी ४ असल्यामुळे ४ च आहे. म्हणून पर्याय क्र. ४ बरोबर

४) ५३ शतकातून २० एकक वजा करून त्यात १ शतक मिळविले तर उत्तर किती येईल?
(१) (२) ५३८० (३) (४)
स्पष्टीकरण - ५३ शतक म्हणजे ५३००
२० एकक = २०
१ शतक = १००
५३००-२० = ५२८०+१००= ५३८०

५) खालीलपैकी कोणत्या संख्येतील ३ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?
(१) ४३४०७ (२) ३०२४८ (३) १०३११ (४) ४०२३२
स्पष्टीकरण - वरील पर्यायातील ३ च्या स्थानाविषयी निरीक्षण करून मग स्थानिक किमतीनुसार सर्वात लहान पर्याय क्र.-४ मधील दशक स्थानी ३ आहे. त्याची किंमत सर्वांत लहान येईल.

६) ५ दह + ३ द.ल. + ३ श+ ७ ह+ २ द. + १ एकक
वरील विस्तारीत मांडणीचे रूप कोणते
?
(१) ३०,००,००० + ० + ५०००० + ७००० + ३०० + २० + १
(२) ५००००० + ३०००० + ३०० + ७००० + २० + १
(३) ५३३७२१
(४) ५०००० + ३०००० + ३००० + ७०० + २० + १
स्पष्टीकरण - द.ल. ल. द.ह. ह. शतक दशक एकक
३ ० ५ ७ ३ २ १
स्थानिक किमतीनुसार - ३०,००,००० + ० + ५०००० + ७००० + ३०० + २० + १ ही किंमत येईल.
पर्याय क्र. १ बरोबर

७) ४००००० + ४००० + ४ या मांडणीपासून खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल?
​​​​​​
(१) ४०४००४ (२) ४०४००००३ (३) ४४०००४ (४) ४००४०४
स्पष्टीकरण - ४०००००
+ ४०००
+ ४
४०४००४
पर्याय क्र. १ बरोबर

८) ७ * ४ * या संख्येत * च्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक ७९२ आहे. तर * च्या जागी येणारा अंक कोणता?
(१) ७ (२) ८ (३) ९ (४) ८००

स्पष्टीकरण - समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक ७९२ आहे. याचा अर्थ तो अंक दिलेल्या ७९२ मधील ७ अंकापेक्षा १ ने जास्त म्हणजे ८ असेल.
म्हणून पर्याय क्र. - २ बरोबर


सरावासाठी प्रश्न

१) ३० + ३००० + ३००००० या विस्तारित रुपानुसार खालीलपैकी संख्या कोणती?
(१) ३००३०३० (२) ३०३०३० (३) ३३००३० (४) ३३००३

२) दीड लाख ही संख्या विस्तारित रुपात कशी लिहावी?
(१) १ ७ १०००० + ५ ७ १००००
(२) १ ७ १००००० + ५ ७ १००००
(३) १ ७ १००००० + २ ७ १०००० + ५ ७ १०००
(४) १ ७ १०००० + ५ ७ १०००० + १ ७ १०००

३) ३५७४८१० या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती?
(१) ४,०९,६०० (२) ४९,६००
(३) ४९,६००० (४) ४,८६,७००

४) २७०४९ या संख्येतील ७ व ४ अंकादरम्यान आणखी ० लिहिले असता तयार झालेली संख्येची किंमत कितीने वाढेल?

(१) ० ने (२) २७००४९ ने
(३) २४३०० ने (४) २४३००० ने

५) २ ह = दशक
(१) २००० (२) २०० (३) २० (४) २

६) पुढीलपैकी कोणत्या संख्येतील ४ या अंकाची किंमत ४ शतक आहे?
(१) ५४५८१ (२) २४०५२४
(३) ६८४६० (४) ७३४१२०

७) योग्य पर्याय निवडा

(१) साडेतीनशे = ३०० + ५० + ० (२) पाऊणेचारणे = ४०० + ७० + ५
(३) सव्वापाचशे = ५०० + २० + ० (४) अर्धा हजार = १००० + ५० + ०


८) ३१९३५४ ही संख्या तिच्या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या बेरजेच्या रुपात मांडली तर पुढील पर्यायात कोणती असेल?

(१) एकोणतीस हजार + तीनशे + चोपन्न + तीन लक्ष
(२) ३००००० + १०००० + ९००० + ३०० + ५० + ४
(३) १००० + ९०००० + ३०० + ५० + ४ + ३०००००
(४) १ ७ १००० + ९ ७ १००० + ३ ७ १००००० + ५ ७ १ + ४ ७ १ + ३ ७ १००

९) ३४१ दशक + ३५ शतक + १२ हजार = ?
(१) १८९१० (२) १२३७६ (३) ३४१३५१२ (४) १८९२०

१०) ९१४७८ मध्ये २ शतक व १ एकक मिळवले तर उत्तर किती येईल?
(१) ९३४७९ (२) ९१४९९ (३) ९१६७९ (४) ९१६७६

११) ५० दशक = ? शतक
(१) ५ (२) ५० (३) ५०० (४) ५०००

१२) २,००,००० + ५००० + ६०००० + ८ + ९० + १०० या विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या कोणती?
(१) २५६८९१ (२) २६५१९८ (३) २५६१९८ ४) २६५१८९

१३) २३१६१९२८ या संख्येतील २ ची स्थानिक किंमत किती असेल?
(अ) २०००००० (ब) २ ७ १०००००० (क) २०००००
(१) अ बरोबर (२) ब बरोबर
(३) क बरोबर (४) अ व ब बरोबर

१४) सात हजार चारशे पंचवीस ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल?
(१) ७००० + ४०० + २५ (२) ७०००० + ४०० + २० + ५
(३) ७००० + ४०० + २० + ५ (४) ७०० + ४००० + २० + ५

उत्तर सूची (१) २ (२) २ (३) ३ (४) ४ (५) २ (६) ३ (७) १ (८) २ (९) १ (१०) ३ (११) १ (१२) २ (१३) ४ (१४) ३

 

संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th scholarship test - face price of locales, local price, extended layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.