इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:03 AM2019-01-16T11:03:04+5:302019-01-16T11:25:47+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -घटक : तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय या घटकामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची माहिती दिलेली असते. त्यामध्ये व्यक्तीचे वय, वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते.

Etc. 5th Scholarship Examination - Subject Test, Logic and Estimation (Linguistic): Age | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - लेख १५, विषय - बुद्धिमत्ता चाचणीघटक :- तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

घटक :- तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय

महत्त्वाचे मुद्दे...

  •  या घटकामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची माहिती दिलेली असते. त्यामध्ये व्यक्तीचे वय, वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते.
  •  वर्षाचा विचार करताना लीप वर्षाचाही विचार करावा लागेल.
  • एकापेक्षा जास्त व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे एकूण वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे.
  •  व्यक्तींमधील वयातील फरक नेहमी तोच कायम राहतो.
  •  काहीवेळा वय दिलेली व्यक्ती स्वत: समजून उदाहरणे सोडविल्यास उत्तराजवळ अचूकपणे पोहोचता येते.
  •  बऱ्याचवेळा पर्यायाकडून उत्तर शोधावे लागते.
     

सोडविलेले उदाहरणे -

१) आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज ५२ वर्षे आहे व त्यांच्या वयातील फरक २३ वर्षे आहे, तर मुलाचे २ वर्षानंतरचे वय किती वर्षे होईल? (२०१७)
१) १० २) १२ ३) १४ ४) १६
स्पष्टीकरण... आई + मुलगा = ५२ वर्षे
त्यांच्या वयातील फरक = २८ वर्षे
५२-२८ = २४ वयातील फरक वजा केला.
२४ भागिले २ = १२ लहान जो असेल त्याचे वय म्हणजेच मुलाचे १२ वर्षे होईल.
२ वर्षानंतरचे मुलाचे वय १२ + २ = १४ वर्षे
उत्तर : पर्याय क्रमांक ३

२) मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या अर्ध्यापटीपेक्षा ४ ने कमी असून, मावशीच्या आजच्या वयाच्या एकतृतीयांश पटीपेक्षा २ ने जास्त आहे. जर आईचे आजचे वय ४२ वर्षे असल्यास मावशीचे दोन वर्षापूर्वीचे वय किती वर्षे असेल? (२०१८)
१) ४३ २) ४५ ३) ४७ ४) ४०
स्पष्टीकरण - मुलाचे वय = आईचे वय - ४ = मावशीचे वय + २ 
                                                    २                         ३

मुलाचे वय = ४२ - ४=२१ - ४ = १७ वर्षे 
                    ----     
                       २
         
मावशीचे वय (१७-२) गुणिले ३ = १५ गुणिले ३ = ४५ वर्षे
दोन वर्षापूर्वीचे मावशीचे वय = ४५-२ = ४३ वर्षे

पर्याय क्र. १
३) अजय विजयपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे, तर ६ वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक किती होईल?
१) ६ वर्षे २) १२ वर्षे ३) १८ वर्षे ४) २४ वर्षे
स्पष्टीकरण - वयातील फरक कायम तोच राहतो तो कधी बदलत नाही.
म्हणून अजय-विजय यांच्या वयांतील ६ वर्षानंतरही फरक १२ वर्षांचा राहील.

४) अमेयचे वय स्वानंदीच्या वयाच्या निमपट आहे. दोघींच्या वयांतील फरक १५ वर्षे असल्यास, त्यांच्या वयांची बेरीज किती असेल?
१) ६० वर्षे २) ३० वर्षे ३) २० वर्षे ४) यापैकी नाही.
स्पष्टीकरण - अमेय व स्वानंदीच्या वयाचे गुणोत्तर =  x : 2x
दोघांच्या वयातील फरक =  2x - x = x = 15
दोघांच्या वयांची बेरीज =  x + 2x = 3x
३ x १५ = ४५ वर्षे  
पर्यायात याचे उत्तर नाही.
पर्याय क्र. ४ बरोबर


५) चिंटू व पिंटू यांच्या आजच्या वयांची बेरीज ३० वर्षे आहे. चिंटूचे आजचे वय १४ वर्षे असल्यास पिंटूचे ३ वर्षापूर्वीचे वय किती असेल?
१) १३ वर्षे २) १५ वर्षे ३) १८ वर्षे ४) २० वर्षे
स्पष्टीकरण - चिंटू + पिंटू = ३० वर्षे
चिंटूचे वय = ३० - १४ = १६ वर्षे पिंटूचे ३ वर्षापूर्वीचे वय १६ - ३ = १३ वर्षे
पर्याय क्र. १ बरोबर

स्वाध्याय -
१) सुजलपेक्षा सोहम ७ वर्षांनी लहान आहे. सोहमचे वय १३ वर्षे असल्यास सुजलचे आजचे वय किती?
१) १३ वर्षे २) ६ वर्षे ३) २३ वर्षे ४) २० वर्षे

२) तन्वी, स्नेहल व प्रियंका या तिघींची आजच्या वयांची बेरीज ३६ वर्षे आहे, तर आणखी ५ वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल?
१) ४१ वर्षे २) ५१ वर्षे ३) ३१ वर्षे ४) ४६ वर्षे

३) दीपाचे वय रामूच्या वयाच्या १/३ पट आहे. शामूचे वय रामूच्या वयाच्या दीडपट आहे व सुमाचे वय दीपाच्या वयाच्या दुप्पट आहे. जर सुमाचे वय १२ वर्षे असल्यास शामूचे वय किती?
१) १२ वर्षे २) २५ वर्षे ३) २७ वर्षे ४) २४ वर्षे

४) दोन वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. आठ वर्षापूर्वी आईच्या व मुलीच्या वयांची बेरीज ५२ असेल, तर आईचे दोन वर्षानंतर किती वय होईल?
१) ५० वर्षे २) १६ वर्षे ३) ४८ वर्षे ४) ५८ वर्षे

५) शरदचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या १/३ आहे. शरदच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. शरदचे आजचे वय १३ वर्षे असल्यास त्याच्या आईचे शरदच्या जन्मावेळी किती वय असेल?
१) २० २) २१ ३) २२ ४) २३

६) जर अजय व विजय यांच्या वयातील फरक ७ वर्षाचा असून ४ वर्षापूर्वी अजयचे वय विजयच्या वयाच्या ८ पट होते, तर त्या दोघांची आजची वये अनुक्रमे किती?
१) ६, १३ २) १४, ७ ३) १६, ९ ४) १२, ५

७) अनुजचे आजचे वय १६ वर्षे आहे, तर वेदिकाचे आजचे वय १८ वर्षे आहे; तर आणखी ५ वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचा फरक असेल?
१) २ वर्षे २) ३ वर्षे ३) ४ वर्षे ४) ५ वर्षे

८) गौरी व गौतम यांच्या वयांची बेरीज ३५ वर्षे आहे. गौरी ही गौतमपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे, तर गौरीचे वय किती?
१) १८ वर्षे २) २० वर्षे ३) २२ वर्षे ४) ३० वर्षे

९) सम्यक व शुभम यांच्या आजच्या वयांची बेरीज २८ वर्षे आहे. सम्यकचे आजचे वय १३ वर्षे असल्यास शुभमचे ३ वर्षांपूर्वीचे वय किती असेल?
१) १० वर्षे २) १२ वर्षे ३) २५ वर्षे ४) ११ वर्षे

१०) अझिम व असिया यांच्या वयात ८ वर्षाचा फरक आहे. त्यांच्या आजच्या वयांची बेरीज १८ वर्षे असल्यास २ वर्षानंतर अझिमचे वय किती होईल?
१) ६ वर्षे २) ७ वर्षे ३) १६ वर्षे ४) २० वर्षे

उत्तरसूची  १) ४    २) २    ३) ३    ४) १    ५) २     ६) ४    ७) १    ८) ३    ९) २    १०) २

Web Title: Etc. 5th Scholarship Examination - Subject Test, Logic and Estimation (Linguistic): Age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.