इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:09 AM2019-02-16T11:09:19+5:302019-02-16T11:10:01+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख -36, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

Etc. 5th scholarship examination, subject-Marathi, component-group word | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

googlenewsNext

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख -36, विषय-मराठी, घटक- समूहदर्शक शब्द

महत्त्वाचे शब्द -

  1. विलींचा- कुंज
  2. नारळांचा- ढीग
  3. हत्तीचा- कळप
  4. करवंदाची -जाळी
  5. उंटाचा- तांडा
  6. काजुंची- गाथण
  7. हरिणींचा- कळप
  8. माशांची- गाथण
  9. मुग्यांची- रांग
  10. किल्ल्यांचा-जुडगा
  11. पक्ष्यांचा- थवा
  12. केसाचा- झुबका, पुंजका
  13. प्रवाशांची- झुंबड
  14. केसांची- बट, जट
  15. गुरांचा-कळप
  16. नाण्यांची- चळत
  17. गाई-गुरांचा- खिल्लार
  18. दुर्वांची- जुडी
  19. खेळाडूंचा-संघ
  20. धान्याची- रास
  21. लमाणांचा- तांडा
  22. नोटांचे- पुडके
  23. माणसांचा- जमाव
  24. केळ्यांचा- घड,
  25. मुलांचा- घोळका
  26. द्राक्षांचा-घड, घोस
  27. विद्यार्थ्यांचा- गट
  28. गवताचा-भारा
  29. साधूंचा-जथा
  30. तारकांचा- पुंज
  31. सैनिकांचे -पथक
  32. ताऱ्यांचा- पुंजका
  33. सैनिकांची-पलटण/तुकडी
  34. वेलींचा- कुंज
  35. मेंढ्यांचा-कळप
  36. विटांचा- ढीग
  37. उतारूंची- झुंड
  38.  झुंबड कलिगडांचा-ढीग
  39. रुपयांची- चवड
  40. मडक्यांची- उतरंड
  41. माणसांचा- जमाव
  42. भाकऱ्यांची- चवड
  43. फुलांचा- गुच्छ
  44. प्रश्नपत्रिकांचा- संच
  45. फुलझाडांचा-ताटवा
  46. पाठ्यपुस्तकांचा-संच
  47. वाद्यांचा- वृंद
  48. विमानांचा- ताफा
  49. लाकडाची- मोळी
  50. उसाची- मोळी
  51. बांबूंचे-बेट
  52. फळांचा- घोस
  53. भक्तांची - मांदियाळी
     

नमुना प्रश्न :-

(1) राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे -------- तयार होते. (2017)
(1) गट (2) जया (3) पथक (4) झुंड

(2) जसे तारा- पुंजका तसे वेल ---?
(1) कुंज (2) पुंज (3) ताटवा (4) गुच्छ

(3) ‘मंदियाळी’ हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो. हे पर्यायातून निवडा (2018)
(1) भक्तांची (2) धान्याची (3) करवंदाची (4) सैनिकांची

(4) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
(1) किल्ल्यांचा-जुडगा (2) उसाची- पेंढी (3) हरणांचा-कळप (4) मुलांचा- घोळका

(5) जसे-केळीचा -घड तसेच भाकऱ्यांची ----?
(1) रास (2) चवड (3) ढीग (4) थप्पी

उत्तरसूची : - (1) 3 (2) 1 (3) 1 (4) 2 (5) 2

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ

Web Title: Etc. 5th scholarship examination, subject-Marathi, component-group word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.