इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय :- मराठी, इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:59 AM2019-01-22T10:59:51+5:302019-01-22T11:08:01+5:30

इ. १ ली ते ५ वी पर्यंत सर्व पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजून घ्यावे लागतील. तसेच माहिती तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनात वापरत असलेले इंग्रजी शब्द शोधून त्यांचा मराठी अर्थ जाणून घ्यावा.

Etc. 5th Scholarship Examination - Subject: - Find alternative words for Marathi, English words | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय :- मराठी, इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय :- मराठी, इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - लेख -२०, विषय :- मराठीघटक :- माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरले जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे.

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, घटक :- माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेत वापरले जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे.

महत्त्वाचे मुद्दे -

  • इ. १ ली ते ५ वी पर्यंत सर्व पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजून घ्यावे लागतील.
  •  तसेच माहिती तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनात वापरत असलेले इंग्रजी शब्द शोधून त्यांचा मराठी अर्थ जाणून घ्यावा.

उदा. - मोबाईल - भ्रमणध्वनी, केबल - तार इ.

इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पुढीलप्रमाणे :

  • रेडिओ - आकाशवाणी
  • इंटरनेट - आंतरजाल
  • एक्सरे - क्ष-किरण
  • पिक्चर - चित्रपट
  • बकेट- बादली
  • अ‍ॅम्ब्युलन्स - रुग्णवाहिका
  • पेशंट - रुग्ण
  • प्रोजेक्टर - पक्षेपक
  • स्क्रीन - पडदा
  • कॉम्प्युटर - संगणक
  • की बोर्ड - कळफलक
  • फॉन्ट - टंकसमूह
  • बॅट - चेंडूफळी
  • बॉल- चेंडू
  • बॉलर - गोलंदाज
  • फिल्डर - क्षेत्ररक्षक
  • हॉस्पिटल - रुग्णालय
  • कॅमेरा - छायाचित्रक
  • स्ट्रेचर - रुग्णशिबिका
  • पेपर - कागद
  • सॅटेलाईट- कृत्रिम उपग्रह
  • रेंज - टप्पा
  • टेलिफोन - दूरध्वनी
  • ई-मेल - संगणकीय पत्र
  • प्रिंट - छाप मुद्रा
  • प्रिंटर - मुद्रक
  • इन्फर्मेशन - माहिती
  • टेक्नॉलॉजी -तंत्रज्ञान
  • आॅफिस - कार्यालय
  • मेसेज - संदेश
  • नेटवर्क - एकमेकांशी जोडणी
  • थ्री डी- त्रिमिती
  • चाट - गप्पा
  • टेबल - बाक
  • शेअर - वाटा
  • सॉफ्टवेअर - संगणक आज्ञावली
  • फॅन - पंखा
  • झेरॉक्स - प्रतिमुद्रा
  • व्हिडीओ - चित्र ध्वनिक्षेपक
  • विंडो - खिडकी
  • पेमेंट - पगार
  • लाईट - पगार


नमुना प्रश्न-

१) पुढे दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानविषयक किती शब्द आहेत? (२०१७)
मेसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल
१) पाच २) सहा ३) चार ४) तीन
स्पष्टीकरण - मेसेज, वेब आणि मोबाईल इ. तीन शब्द माहिती तंत्रज्ञानविषयक आहेत.

२) पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? (२०१८)
१) युजर २) प्रिंट ३) न्यूजपेपर ४) नेटवर्क
स्पष्टीकरण - न्यूजपेपर हा वर्तमानपत्राचा अर्थ आहे.

३) असियाचा मोबाईल खूप छान आहे.
वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता आहे?
१) संगणक २) दूरध्वनी ३) भ्रमणध्वनी ४) ध्वनिक्षेपक
स्पष्टीकरण - मोबाईल - भ्रमणध्वनी

४) गटात न बसणारा शब्द ओळखा
१) सायकल २) बस ३) रेल्वे ४) विमान
स्पष्टीकरण - सायकल, बस व रेल्वे ही इंग्रजी नावे आहेत.

५) ...... सहाय्याने संगणकावर आपण टंकलेखन करतो.
१) कळफलक २) दूरध्वनी ३) प्रदर्शक ४) मुद्रक
स्पष्टीकरण - कळफलक हे उत्तर येईल.

स्वाध्याय -

१) ‘युजर’ या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?
१) जोडणी २) वापरप्रणाली ३) वापरकर्ता ४) माहिती

२) गटात न बसणारा शब्द ओळखा-
१) टेबल २) वाटा ३) संदेश ४) गप्पा

३) इन्फर्मेशन शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?
१) उपग्रह २) संवाद ३) माहिती ४) प्रदर्शक

४) जगातील विविध माहिती व ज्ञान ------------- आपणास देतो.
१) संगणक २) आंतरजाल ३) तबकडी ४) प्रक्षेपक

५) अ‍ॅम्ब्युलन्स आली की त्याला वाट द्यावी
बोल्ड केलेल्या शब्दाला मराठीत काय म्हणतात?
१) दवाखाना २) रुग्ण ३) रुग्णशिबिका ४) रुग्णवाहिका

६) ‘वेब’ या इंग्रजी शब्दाला मराठीतील अर्थ सांगा.
१) जाळे २) आंतरजाल ३) छपाईयंत्र ४) कळफलक

७) सॅटेलाईट या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द कोणता?
१) उपग्रह २) प्रणाली ३) गणकयंत्र ४) यंत्रमानव

८) कम्युनिकेशन या शब्दाला मराठी शब्द कोणता?
१) दृष्टी २) संवाद ३) संदेश ४) गप्पा

९) मी सिस्टिममध्ये प्रोग्रॅम इन्स्टॉल केल्यावर स्क्रिनवर माहिती मिळाली. या वाक्यात किती तंत्रज्ञानविषयक इंग्रजी आलेले आहेत?
१) दोन २) तीन ३) चार ४) पाच

१०) आमच्या अझिमला ---------कार्टून पहायला खूप आवडतात. या वाक्यात रिकाम्या जागी योग्य मराठी शब्द भरा.
१) आकाशवाणी २) दूरचित्रवाणी ३) प्रक्षेपक ४) प्रिंटर

११) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
१) मॉनिटर २) प्रिंटर ३) वेबसाईट ४) कळफलक

१२) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
१) आंतरजाल २) आज्ञावली ३) वापरकर्ता ४) छपाईयंत्र

१३) व्हिडीओसाठी मराठी शब्द कोणता?
१) ध्वनिक्षेपक २) चित्रक्षेपक ३) प्रक्षेपक ४) ध्वनिचित्रक्षेपक

१४) डिस्क या शब्दासाठी मराठी शब्द कोणता वापराल?
१) तबकडी २) तबक ३) हालचाल ४) सरकणे

१५) आॅपरेटिंग सिस्टिम शब्दासाठी मराठी शब्द कोणता?
१) आज्ञावली २) वापर प्रश्नावली ३) वापर प्रणाली ४) चित्र प्रणाली

उत्तरसूची - १) ३ , २) १, ३) ३ , ४) २, ५) ४, ६) १, ७) १, ८) २, ९) ३, १०) २, ११) ४, १२) ४, १३) ४, १४) १, १५) ३
 

Web Title: Etc. 5th Scholarship Examination - Subject: - Find alternative words for Marathi, English words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.