धोरणानुसार निधीचा उपयोग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:49+5:30

जिल्हाधिकारी एम.जे.प्रदीपचंद्रन उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, उपविभागीय अधिकारी भंडारा श्रीकृष्ण पांचाळ तहसीलदार मल्लिक विरानी, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दौंदल, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, लाखनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ज्योती निखाडे उपस्थित होते.

Use funds according to strategy | धोरणानुसार निधीचा उपयोग करा

धोरणानुसार निधीचा उपयोग करा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : साकोली येथे विविध विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शासकीय योजनांचे प्रारूप व उद्देश साधून सर्वसामान्य नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. याकरीता नियोजन बद्ध व कालबद्ध पद्धतीने कार्य करा. शासकीय धोरणानुसार निधीचा उपयोग करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
साकोली उपविभागीय क्षेत्रातील आढावा बैठकीत ते मंगळवारी बोलत होते. साकोली येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी चार कोटी ९६ लाख ३० हजारांचा निधी मंजूर झाला असून दोन हेक्टर जागेत पंचायत समितीची नवीन इमारत दहा हजार सातशे एकवीस चौरस फूट मध्ये बांधकामाचे टेंडर झाले असून लवकरच त्याचे वर्क ऑर्डर काढण्याचे निर्देश पटोले यांनी दिले. त्याचप्रमाणे लाखांदूर येथील पंचायत समितीच्या नवीन इमारती करता ९ कोटी ३० लाख रुपयांचे प्रस्ताव पाठविण्यात आली असून ते सुद्धा लवकरच मंजूर करण्यात येतील व जुन्या ठिकाणी पंचायत समितीची नवीन इमारत तयार करण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. उपविभागीय क्षेत्रातील तालुका क्रीडा संकुलाच्या देखरेखीसाठी स्थानिक स्तरावर समिती तयार करावी. क्रीडा संकुल सुशोभित व सर्व सोयीनी युक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे सूचना पटोले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी एम.जे.प्रदीपचंद्रन उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, उपविभागीय अधिकारी भंडारा श्रीकृष्ण पांचाळ तहसीलदार मल्लिक विरानी, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दौंदल, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, लाखनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ज्योती निखाडे उपस्थित होते. गोसेखुर्द डाव्या कालव्याचे व नेरला उपसा सिंचन योजना तसेच निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम हे अंतिम टप्प्यात असून उर्वरित भूसंपादनाच्या अडचणी दूर करून प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदला तातडीने द्यावा अशा सूचना केल्या. या आढावा बैठकीत रोजगार हमी योजना सर्व प्रकारच्या आवास योजना प्रलंबित भूसंपादन प्रकरणे, पाणीटंचाई सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती वनहक्क अतिक्रमणाबाबत मुद्दे शेतकरी कर्ज मुक्ती योजना, अशा विविध विषयांच्या आढावा घेण्यात आला.

कृषी विभागाचा पुढाकार
कृषी विभागाने क्रियाशील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ शेतकºयांना मिळावा याकरिता प्रयत्न करावे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असून त्याला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Use funds according to strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.