उद्यानात झाडे वाळली, खेळणीही तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:55+5:30

शहरातील सिव्हील लाईन शासकीय वसाहतीत जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपुर्ण योजनेतून २०१४-१५ मध्ये उद्यान्याचे बांधकाम करण्यात आले. ६ मे २०१५ रोजी या उद्यान्याचे रितसर उद्घाटन झाले. परिसरातील नव्हे तर शहरातील सर्वांना मोठा आनंद झाला होता. याठिकाणी लावण्यात आलेली खेळणी बालकांना आकर्षित करीत होती.

Trees dried up in the park, and toys were broken | उद्यानात झाडे वाळली, खेळणीही तुटली

उद्यानात झाडे वाळली, खेळणीही तुटली

Next
ठळक मुद्दे मोकाट जनावरांचे वास्तव्य : सिव्हील लाईन उद्यानाची दुरावस्था, चिमुकल्यांचा हिरमोड

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी नगर परिषदेने ठिकठिकाणी उद्यान्याची निर्मिती केली आहे. लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र देखभाल दुरुस्तीअभावी बहुतांश उद्यान्यांची अवस्था सपाट मैदानात होत आहे. सिव्हील लाईन परिसरातील उद्यान्यात तर झाडे वाळली असून खेळणीही तुटलेली आहे. मोकाट जनावरांचे वास्तव्य राहत असून चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे.
शहरातील सिव्हील लाईन शासकीय वसाहतीत जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपुर्ण योजनेतून २०१४-१५ मध्ये उद्यान्याचे बांधकाम करण्यात आले. ६ मे २०१५ रोजी या उद्यान्याचे रितसर उद्घाटन झाले. परिसरातील नव्हे तर शहरातील सर्वांना मोठा आनंद झाला होता. याठिकाणी लावण्यात आलेली खेळणी बालकांना आकर्षित करीत होती. चिमुकले या उद्यान्यात जाण्यासाठी हट्ट धरुन बसत होती. काही काळ सुस्थितीत असलेले हे उद्यान आता सपाट मैदानात बदलू लागले आहे. मैदानात ठिकठिकाणी कापलेल्या गवताच्या ढिग पडले आहे. येथील सुरक्षा रक्षकाला वेळेवर मानधन मिळत नसल्याने तोही दुर्लक्ष करीत आहे.
आता या उद्यान्यात मोकाट जनावरांचा हैदोस सुरु असतो. पाण्याअभावी वृक्ष वाळली असून काही खेळणीही मोडकडीस आली आहे. लहान मुले याठिकाणी खेळण्यासाठी जातात. परंतु तेथील अवस्था पाहून पालक त्यांना या खेळण्यावर खेळण्यास मनाई करतात.
नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या या उद्यान्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ही अवस्था झाल्याचे या परिसरातील नागरिक सांगतात. पुर्वी येथे सायंकाळच्या वेळी वृध्द निवांतक्षणी गप्पा मारायचे, लहान मुलांची किलबील ऐकु यायची परंतु आता सर्व काही शांत झाले आहे. एखाद्या खंडहरमध्ये या बगीच्याचे रुपांतर होऊ पाहत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत वारंवार नगर परिषदेला सुचना दिल्या. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. शहरातील सर्वच उद्यान्यांची दुरावस्था झाली असताना एकमेव उद्यान सुस्थितीत होते. आता तेही मोडकडीस आले आहे.
या उद्यान्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेने गरज निर्माण झाली आहे.

मिस्किन टँक, समता नगरातील उद्यान मोडकळीस
भंडारा शहरातील मिस्किन टँक आणि समता नगरातील उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मिस्किन टँक परिसरातील रनिंग ट्रॅक अरुंद झाला आहे. त्यामुळे सकाळी येथे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खांबतलाव परिसरातील उद्यान तर तारगट तरुणांचा अड्डा झाला आहे. याठिकाणी रात्रीच्या वेळी ओपन बार भरविला जातो. मद्याच्या बॉटल आणि खाद्यपदार्थांचे पाकीट येथेच फेकली जातात. शहराच्या इतर भागातील उद्यानांचीही अवस्था फारशी चांगली नाही. परंतु नगर परिषद या उद्यानांच्या विकासासाठी कोणतीच पाऊले उचलत नसल्याने नागरिकांत संताप आहे.

Web Title: Trees dried up in the park, and toys were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.