कंटेन्मेट झोनमधील एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:53+5:30

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम पळविल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे सदर एटीएम कंटेनमेंट झोन मध्ये असून या परिसरात पोलिसांचा पहाराही असतो.

Thieves broke into an ATM in a container zone and stole Rs 9 lakh | कंटेन्मेट झोनमधील एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख पळविले

कंटेन्मेट झोनमधील एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख पळविले

Next
ठळक मुद्दे भंडारा शहरातील घटना। इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील एसबीआयचे एटीएम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील राष्ट्रीय महामार्गालगत कंटेनमेंट झोनमधील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख ४० हजार रुपये पळविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडली. कंटेनमेंट झोनमध्ये चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. चोरट्यांच्या शोधासाठी शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे.
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पटवारी भवनच्या समोर इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समध्ये भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सकाळी एटीएम फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि स्टेट बँकेला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रक्कम पळविल्याचे पुढे आले. विशेष म्हणजे सदर एटीएम कंटेनमेंट झोन मध्ये असून या परिसरात पोलिसांचा पहाराही असतो. अशा स्थितीत अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील एटीएम फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एटीएम फोडणारे मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मध्ये शिरले असावे असा कयास पोलिसांना आहे. लॉकडाऊनच्या काळात सदर चोरटे कोणत्या वाहनाने आले याचाही शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा शहर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरांचा शोध घेणे कठीण झाले आहे. तसेच एटीएम मधील कॅमेऱ्यातही पुरेसे फुटेज आल्याचे दिसत नाही. ही घटना केव्हा घडली याचाही थांगपत्ता लागला नाही.
पोलिसांची दोन पथके तयार
कंटेनमेंट झोनमध्ये चोरी झाल्याने पोलीस खळबळून जागे झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात दोन पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे आणि भंडाराचे ठाणेदार लोकेश कानसे या घटनेचा शोध घेत आहेत. वृत्त लिहिस्तोवर कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

जिल्ह्यात एटीएम फोडणारी टोळी सक्रिय
भंडारा जिल्ह्यात अलिकडे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील बँक आॅफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती लागले नव्हते. कोंढा, जवाहरनगर येथेही एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या. तुमसर शहरातही चोरट्यांनी एटीएम फोडले होते. मात्र अद्यापपर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून पैसे पळविणारी ही टोळी आंतरराज्यीय असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. भंडारा शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे. बहुतांश एटीएम मध्ये चौकीदारही नसतो. तेथील कॅमेरेही अनेकदा बंद असतात. एखादी घटना घडल्यानंतरच त्याची चर्चा होते.

Web Title: Thieves broke into an ATM in a container zone and stole Rs 9 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.