A tank filled with a rear facing the road | भर रस्त्यात उलटला लाकडे भरलेला ट्रॅक्टर
भर रस्त्यात उलटला लाकडे भरलेला ट्रॅक्टर

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : तुमसर- देव्हाडी मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लाकुड वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर बुधवारी सकाळी ७ वाजता भर रस्त्यात पलटला. ट्रॅक्टरमधील लाकडांचे ओंडके रस्त्यावर पसरले. सुदैवाने ट्रॅक्टरचालक बचावला. सदर अपघातामुळे तुमसर-देव्हाडी मार्गावरील काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.
तुमसर- देव्हाडी मार्गावर बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रॅक्टर अनियंत्रीत होऊन पलटला. ट्रॅक्टरमधील लाकडे रस्त्यावर आडवे पडले. ट्रॅक्टरचे इंजिनचा दर्शनी भाग रस्त्याच्याकडेला उतरला. ट्रॅक्टर चालकाच्या प्रसंगवधानाने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. सकाळी सदर मार्गावर काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.
ट्रॅक्टरमध्ये इंजिन बिघाड होऊन वजनामुळे यंत्राचा काही भाग तुटल्याने ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याची माहिती आहे. सकाळी सदर रस्त्यावर मोठी वाहने धावत नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
लहान वाहने व दुचाकी चालक सदर अपघातातून थोडक्यात बचावले अशी माहिती आहे. सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या या रस्त्यावर मोठी आहे. ट्रॅक्टरचा वेग कमी होता. त्यामुळे ट्रॅक्टरवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात ट्रॅक्टर चालकाला यश आले. सदर ट्रॅक्टरमधील लाकडे कुठली आहेत व कुठे नेत होते याबाबत माहिती कळू शकली नाही. रस्त्यावरील लाकडे हटविण्यात आली. त्यानंतर रस्ता मोकळा झाला.


Web Title: A tank filled with a rear facing the road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.