तुमसर तालुक्यात रेतीतस्करांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:46+5:30

तुमसर तालुक्यात वैनगंगेचा विस्तीर्ण दीपात्र असून तेथून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. तुमसर तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन ते चार किमी अंतरावर नदीचे पात्र आहे. तामसवाडी नदीपात्र रेती तस्करांना मोकळे झाल्याचे चित्र दिसत आहे. सीतेपार शेतशिवारात रस्त्यालगत रेतीसाठा करण्यात आला आहे.

Sand dunes in Tumsar taluka | तुमसर तालुक्यात रेतीतस्करांचा धुमाकूळ

तुमसर तालुक्यात रेतीतस्करांचा धुमाकूळ

Next
ठळक मुद्देतामसवाडी नदीपात्रातून रेतीचा उपसा । सीतेपार शिवारात रेतीची डम्पिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : डोंगरला सितेपार शिवारात अवैध रेतीचा प्रचंड मोठे साठे रेती तस्करांनी केले आहेत. वैनगंगा नदीपात्रातील तामसवाडी (सी.) रेती घाटातून रेतीचा अवैध उपसा दिवसरात्र सध्या सुरु आहे. ट्रॅक्टरने रेतीचा उपसा करून रेती साठ्यावर तो साठवणूक केली जाते. तेथून ती ट्रकने नागपूरकडे रवाना केली जात आहे.
तुमसर तालुक्यात वैनगंगेचा विस्तीर्ण दीपात्र असून तेथून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरु आहे. तुमसर तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन ते चार किमी अंतरावर नदीचे पात्र आहे. तामसवाडी नदीपात्र रेती तस्करांना मोकळे झाल्याचे चित्र दिसत आहे. सीतेपार शेतशिवारात रस्त्यालगत रेतीसाठा करण्यात आला आहे. झुडपी जंगलाची तथा खासगी जागेत रेतीचा साठा केला जात आहे. रेतीसाठ्यातून रेती ट्रकमध्ये असून ती नागपूरकडे रवाना केली जात आहे.
नदीपात्रातून रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरून ती रेती साठा स्थळावर नेली जात. या कामात सुमारे ४० ते ५० ट्रॅक्टर गाव व परिसरातील लावले गेले आहे. दुपारी काही वेळ वगळता सुमारे १४ ते १५ तास रेतीचा उपसा नदीपात्रातून केला जात आहे.
तुमसर तालुक्यातील नियमबाह्य रेती नागपूर येथे दररोज ट्रक भरून जात आहे. तुमसर ते नागपूर हे १०० किमीचे अंतर आहे. परंतु सदर ट्रक सुखरुप नागपूर पर्यंत पोहचत आहेत. तुमसर तालुक्यात सध्या एकही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. परंतु सर्रास रेतीचा उपसा व व्यवसाय फोफावला आहे. तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथील रेती घाटातून अवैध रेतीचा उपसा सुरु होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर रेती घाटावर कारवाई करण्यात आली. येथील रेती साठा जप्त करण्यात आला. दोन रेतीसाठे सील करून त्यांचा लिलाव करण्यात आला. एक रेतीसाठा १२ लाख तर दुसरा रेतीसाठा तीन लाखाला लिलाव करण्यात आला. येथे महसूल विभागाने तपासणी चौकी लावली आहे. २४ तास रेती घाटावर देखरेख ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांचे आदेशानुसार महसूल अधिकारी व कर्मचारी रात्री भरारी पथकासोबत रेती तस्करांच्या मागावर आहेत. शुक्रवारी सुकळी मुंढरी रेती घाटावर त्यांनी भेट दिली. तुमसर शहरात प्रवेशद्वारावरील खापा चौफुलीवर महसूल प्रशासनाने शनिवार पासून तपासणी चौकी लावली आहे. त्यामुळे ते चोरट्या रेतीवर आळा बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Sand dunes in Tumsar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर