पाच कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश
By Admin | Updated: September 21, 2014 23:45 IST2014-09-21T23:45:33+5:302014-09-21T23:45:33+5:30
जादा दराने रासायनिक खताची विक्री केल्या जात असल्याचा तक्रारी प्राप्त होताच भरारी पथकाने केलेल्या कारवाहीत पाच कृषी केंद्रावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले. युरिया खताची कृत्रिम टंचाई

पाच कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश
लाखांदूर : जादा दराने रासायनिक खताची विक्री केल्या जात असल्याचा तक्रारी प्राप्त होताच भरारी पथकाने केलेल्या कारवाहीत पाच कृषी केंद्रावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले. युरिया खताची कृत्रिम टंचाई भासवून शेतकऱ्यांची लूट केली जात होती. या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
तालूक्यात ११०० रासायनिक खत, ७६ औषधे विक्री, तर बियाणे विक्रीचे एकुण ६५ परवानाधारक कृषी केंद्र आहेत. यंदा हंगाम सुरु झाला असल्यानंतरही पावसाला जोरदार सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत फवारणी केली नाही. मात्र त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी खत फवारणीला एकदम सुरुवात केल्याने अचानक मागणी वाढली. ४५० मे. टन युरिया खताचा साठा तालुक्यात असतांना मागणी वाढली व खताची टंचाई निर्माण झाली. नेमका याचाच फायदा घेत. कृषी केंद्र संचालकांनी युरिया खताची विक्री जादा दराने करणे सुरु केली.
कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. भरारी पथकाने तक्रारीची तत्काळ दखल घेत. तात्काळ कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी सुरु केल्या.
यात ६५ कृषी केंद्राच्ांी चौकशी करण्यात आली. रेकॉर्ड अद्ययावत नाही, वेळोवेळी विक्री व साठा अहवाल कार्यालयास सादर नाही, स्टॉक बरोबर नाही. असा ठपका ठेवत पाच कृषी केंद्रावर कार्यवाही करुन त्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले.
पुरुषोत्तम कृषी सेवा केंद्र, गवराळा, प्रथम कृषी केंद्र कुडेगाव, साई कृषी केंद्र विरली/बु., गणेश कृषी केंद्र लाखांदुर/किन्हाळा, वैभव कृषी केंद्र, करांडला यांचेवर कार्यवाही करीत विक्री बंदचे आदेश देण्यात आले. यामुळे कृषी केंद्र संचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
यूरीया खताची तीव्र टंचाई असल्या कारणाने कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची जादा दराने खत विक्री करुन लूट सुरु केली आहे. या सर्व प्रकाराची दखल घेत. युरियाचा साठा असलेल्या कृषी केंद्रामध्ये कृषी सहायकांच्या उपस्थितीत यूरीया खताची विक्री करण्यात आली. याकरिता आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार ही कार्यवाही केल्या जाते. भरारी पथकामध्ये कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर संजय लांजेवार, तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी कार्यवाही केली. (तालुका प्रतिनिधी)