नाविण्यपूर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:29+5:30

सण, उत्सव, नात्यातील कार्यक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची थोडीफार उपस्थिती कमी असायची. पण १०० टक्के उपस्थिती कशी ठेवायची? हा एक यक्ष प्रश्न शाळेसमोर उभा होता. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व घटकांच्या माध्यमातून नाविन्यर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प पवनी तालुक्यातील काकेपार येथील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक शाळेने केला आहे. प्रत्येक वगार्साठी एक झेंडा निश्चित करण्यात आला.

Resolve to implement innovative daily activities | नाविण्यपूर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प

नाविण्यपूर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प

Next
ठळक मुद्देशिक्षकांचा पुढाकार : जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळा काकेपार

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : सण, उत्सव, नात्यातील कार्यक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची थोडीफार उपस्थिती कमी असायची. पण १०० टक्के उपस्थिती कशी ठेवायची? हा एक यक्ष प्रश्न शाळेसमोर उभा होता. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व घटकांच्या माध्यमातून नाविन्यर्ण दैनंदिन उपक्रम राबविण्याचा संकल्प पवनी तालुक्यातील काकेपार येथील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक शाळेने केला आहे.
प्रत्येक वगार्साठी एक झेंडा निश्चित करण्यात आला. फोटोच्या डावीकडून उजवीकडे वर्गाचा क्रम लावण्यात आला.(जसे डावीकडून पहिला झेंडा पहिल्या वर्गाचा, त्यानंतर दुसरा झेंडा दुसरा वर्ग, याप्रमाणेच शेवटचा झेंडा सातवा वर्ग सातवा झेंडा या पध्दतीने) ज्या वर्गाची उपस्थिती ज्या दिवसाला १०० टक्के असेल त्या-त्या वर्गाचा झेंडा लावण्यात येईल. जे वर्ग सत्रात जास्तीत वेळा १०० टक्के उपस्थित राहतील, त्या-त्या वर्गाला बक्षिस देण्यात येईल असे ठरले. सत्रातील सुरवातीला चार ते पाच वर्गच १०० टक्के उपस्थित राहायचे. पण या उपक्रमामुळे १०० टक्के शाळेत उपस्थित राहतात.
आपला वर्ग १०० टक्के कसा उपस्थित ठेवता येईल, यासाठी विद्यार्थी उत्साहपूर्वक प्रयत्नरत राहतात. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास इतर विद्यार्थी त्याला शाळेत येण्यासाठी प्रेरीत करीत असतात. प्रकृतीची बाब असेल तेव्हाच अनुपस्थित असतात, अन्यथा नसतात. अशाप्रकारे मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी व पालक अशा चौकोणी सहकार्यातून जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काकेपार येथे दैनंदिन हजेरी उपक्रम नित्यनियमाने राबविला जातो. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास गिरी, शाळेतील शिक्षक मुरारी कढव, हिरालाल वाकडे, चंपा केदारे, संतोषी दहिफडे यांनी योगदान दिले.

Web Title: Resolve to implement innovative daily activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.