पडलेल्या धानाला दिली उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:14+5:30

काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.

The raised grain gave rise | पडलेल्या धानाला दिली उभारी

पडलेल्या धानाला दिली उभारी

Next
ठळक मुद्देपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड : शासनाने त्वरित मदत करण्याची बळीराजाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सासरा : परतीच्या पावसासह झालेल्या वादळाने सासरा व परिसरातील धानपीक पडले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने कित्येकांचे धान पीक सडायला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पाने गुंडाळणारी अडी व तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पीक वाचवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी वाटेल ते उपाय करायला सुरुवात केली आहे. काहींनी भरमसाठ औषधांची फवारणी केली. मात्र यश मिळाले नाही. निसर्गाच्या अपकृपेने तोंडातील घास हिरावून घेण्याची परिस्थिती निमार्ण झाल्याने शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले असून आहे.
वारंवार उद्भवणाऱ्या संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यातून सावरण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. हिम्मत हारलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही.
आपण लढलेच पाहिजे. स्वस्थ बसलो तर आपल्या पदरात निराशाशिवाय काहीच पडणार नाही. हातातून पीक निसटेल. यासाठी शेतकऱ्यांच्या मनात एक युक्ती सुचली.
काही शेतकऱ्यांनी कसलीही पर्वा न करता पडलेला धान पीक उभे करुन त्याच्या जुड्या बांधण्याचे काम सुरु केले. हा प्रयोग गावात कधीच न केल्याने शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा विषय ठरला. काहींनी हसू केले. सर्व प्रथम या उपाययोजनेच्या कामाला सुरुवात येथील खुशाल काशीराम सोनटक्के, कुसुम माणिकराव खर्डेकर, मंजुळा गुलाब इटवले, रविकांता रमेश सावरकर, उत्तम धोंडू इटवले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली.
प्रतिनिधीने या शेतकऱ्यांची भेट घेतली असता या प्रयोगाने नुकसान टळल्याचे दिसून आले. या प्रयोगाने खर्च जरी वाढला असला तरी सडणारे धानपीक वाचवता आले. आम्ही असा प्रयोग केल्याने आमच्या हाती थोड्याफार प्रमाणात तरी धान्य पडेल. शेतीत झालेला खर्च तरी काढता येईल असे काहींनी सांगितले. काहीच उपाय केला नसता तर आमच्या पदरात तणीसच पडले असते, अशा संतप्त प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

संकटांचा सामना करताना बळीराजा हतबल
यावर्षी बळीराजावर सातत्याने संकटे सुरु आहेत. पूरात सावरत नाही. तोच परतीच्या पावसाने अनेक शेतातील धानपिक उद्ध्वस्त केले. मात्र त्यातही काही शेतकऱ्यांनी आपले पिक वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. एकीकडे पीक वाचवण्याची कसरत तर दुसरी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे बळीराजा त्रासला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी होत आहे. अस्मानी, सुल्तानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांची या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दया येत नसेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

माझ्या शेतातील धान पडला होता. त्याच्यावर पाणी तरंगत होते. याला उभे करुन वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहीना काहीतरी धान्य मिळेल अन्यथा हे धान पीक सडेल. कोणत्याही परिस्थितीत या निसाडा झालेल्या धानाची लोंबी बाहेर काढण्याची गरज होती. महिला मजूर कामाला लावून धान पीक उभे करुन त्यांच्या जुड्या बांधल्या. सध्या तरी मी केलेला प्रयोगाने मजूरीचा खर्च वाढला पण सडून पूर्णत: नष्ट होणाऱ्या पिकाला थोड्याफार प्रमाणात वाचवण्याचे समाधान मिळाले.
-खुशाल सोनटके, शेतकरी

Web Title: The raised grain gave rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.