संततधार पावसाने अनेक घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:52+5:30

परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मातीची भींत सविताच्या अंगावर कोसळली.

Rain rained down many homes | संततधार पावसाने अनेक घरांची पडझड

संततधार पावसाने अनेक घरांची पडझड

Next
ठळक मुद्देपरसोडी येथील घटना : जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : परिसरात संततधार पाऊस पडल्याने एक महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून जखमी झाली. उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. सविता सुर्यभान थेरे (५५) असे जखमीचे नाव आहे.
परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मातीची भींत सविताच्या अंगावर कोसळली. घरा शेजारच्या आरडाओरडाने घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामपंचायत सदस्य दर्शन फंदे यांनी मातीच्या ढिगाऱ्याखालील महिलेस सुखरुप बाहेर काढले. जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज ८ सप्टेंबर रोजी उपचारानंतर सुटी देण्यात आली.
सदर कुटूंब हे दारिद्र रेषेखाली असून आपले जीर्ण व मोळकळीस आलेले घर दुरुस्त करुन नवीन घरकुल देण्याची ग्रामपंचायतकडे मागणी केली. मात्र याकडे सरपंच यांनी दुर्लक्ष केले. यापूर्वी जवाहरनगर परिसरातील सर्व गावातील सरपंच यांना ठाणेदार सुभाष बारसे यांनी आवाहन केले आहे. यात आपातकालीन व्यवस्थानुसार गावातील जिर्ण व मोडकळीस आलेल्या घरातील कुटूंबाना सुरक्षीतस्थळी हलविण्याच्या सूचना आहेत.
ग्रामपंचायत भवन, जिल्हा परिषद शाळा, समाज भवन येथे रात्रकालीन निवाºयाची सोय करण्याचे सुचना आहेत. सदर घटना स्थळी तलाठी कुमुदनी सिरसागर, माजी सरपंच पंकज सुखेदवे, ग्राम पंचायत सदस्य दर्शन फंदे यांनी भेट दिली. सदर घनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

ढोलसर येथे दोन जखमी
विरली बु. : लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे लगतच्या घराची भिंत कोसळून युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने येथे दोन घरे कोसळली. या घटनेतील जखमी युवकावर वडसा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेतील जखमी युवकाचे नाव अजय केशव हेमने (३०) असे आहे. त्यामुळे अजय बराच वेळ ढिगाºयाखाली दबून राहिला. शेवटी त्याला बेशुध्दावस्थेत बाहेर काढून तातडीने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्याला वडसा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दुसºया घटनेत प्रदीप वाढई यांच्या घराची भींत अनिल केशव हेमणे यांच्या घरावर कोसळल्याने त्यांचे घर भुईसपाट झाले. यात अनिल हेमणे यांचे जीवनोपयोगी साहित्य नष्ट झाले आहे. सदर दोन्ही कुटूंबाना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Rain rained down many homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस