प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सुटता सुटेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:30+5:30

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अंतर्गत सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करणे, अधिसंख्य शिक्षकांना वेतन वाढ देणे, १५ जुलै २०१४, आक्टोबर २०१४ ला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा प्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे रिक्त जागा त्वरित भराव्यात, पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, प्राथमिक शिक्षकांकडून रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार अभावित पद्धतीने केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती द्देण्यात यावी, .......

The problems of primary teachers are not solved | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सुटता सुटेना 

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सुटता सुटेना 

googlenewsNext
ठळक मुद्देविविध प्रश्नांवर चर्चा : अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे 

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दशकभरापासून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. अनेकवेळा आश्वासने मिळाली मात्र त्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात आला नाही. अशीच बाब समोर ठेऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  मनोहर बारस्कर यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी बारस्कर यांचे स्वागत करून शिक्षकांच्या समस्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीचे नेतृत्व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अंतर्गत सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करणे, अधिसंख्य शिक्षकांना वेतन वाढ देणे, १५ जुलै २०१४, आक्टोबर २०१४ ला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा प्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे रिक्त जागा त्वरित भराव्यात, पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, प्राथमिक शिक्षकांकडून रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार अभावित पद्धतीने केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती द्देण्यात यावी, पदावनत झालेल्या शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, वैद्यकीय प्रतिपूर्ती मंजूर झालेल्या शिक्षकांची देयके निकाली काढण्यात काढावी, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या प्रकरणात त्वरित मंजुरी देण्यात यावी, मागील वर्षी निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची थकबाकी निकाली काढावी,  वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांचे प्रकरणे मंजूर करावी आदी मागण्यांवर शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांच्याशी चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने सर्वात प्रथम शिक्षणािधकारी बारस्कर यांच्याशी भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. 
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या लक्षात घेता शिक्षणाधिकारी बारस्कर यांनी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, श्रावण लांजेवार, संजय आजबले, विकास गायधने, बाळकृष्ण भुते, अरुण बघेले, यशपाल वाघमारे, अशोक ठाकरे, रषेसकुमार फटे, नेपाल तुरकर, जे.एम. पटोले, रवी उगलमुगले, सुनील निनावे, विजय चाचेरे, सुरेश कोरे, केशव अतकरी, योगेश पुडके, किशोर ईश्वरकर, मंगेश नंदनवार, नरेंद्र रामटेके, आदेश बोंबार्डे, एन.डी. शिवरकर, हरिदास घावडे, लीलाधर वासनिक, विनय धुमणखेडे, संजय झंझाड यासह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: The problems of primary teachers are not solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक