कोरोनाच्या नावाखाली पोस्ट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:59+5:30

लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. सानगडी येथील पोस्ट मास्तर उपस्थित राहत नसल्याने गत दीड महिन्यांपासून पोस्ट कार्यालय बंद आहे. याचा सानगडीसह परिसरातील हजारो खातेधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. साकोली तालुक्यातील सानगडी येथील २५ किमी अंतरावरुन खातेधारकांना विचारपूस करण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.

Post closed under Corona's name | कोरोनाच्या नावाखाली पोस्ट बंद

कोरोनाच्या नावाखाली पोस्ट बंद

Next
ठळक मुद्देसानगडी येथील प्रकार : वरिष्ठांचे दुर्लक्ष, ग्राहकांची परवड, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत चालल्याने शासकीय कार्यालय काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक दिवसापासून साकोली तालुक्यातील सानगडी येथील पोस्ट आॅफीस बंद असल्याने ग्राहकाची फरवड होत आहे.
लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाने बंधनकारक केले आहे. सानगडी येथील पोस्ट मास्तर उपस्थित राहत नसल्याने गत दीड महिन्यांपासून पोस्ट कार्यालय बंद आहे. याचा सानगडीसह परिसरातील हजारो खातेधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. साकोली तालुक्यातील सानगडी येथील २५ किमी अंतरावरुन खातेधारकांना विचारपूस करण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. वारंवार पोस्टमास्तरला विचारणा केली असता मशीन बंद आहे. लिंक फेल आहे, मशीन दुरुस्त झाल्याशिवाय काम सुरु होणार नाही, अशी उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येतात.
वरीष्ठांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने त्रस्त नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत. सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांची धान रोवणीची कामे सुरु आहे. अशात अनेकजण वेळ काढून खातेधारक विचारपूस करण्यासाठी जातात. मात्र कार्यालयच बंद राहत असल्याने अनेकदा काम होत नाही. पोस्ट आॅफीस कार्यालयाची ग्रामीण भागातील वेळ सकाळी ९.३० वाजताची आहे. परंतु येथील कर्मचारी सकाळी ११ नंतरच येत असल्याने अनेक खातेधारकांना आल्यापावली परतावे लागते. गत दीड महिन्यांपासून वारंवार विचारपूस करुन देखील पोस्ट कार्यालयातील कामे होत नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक खातेधारकांनी पोस्ट कार्यालय बंद असल्याचे फोटो काढून वरीष्ठांकडे सादर करणार आहेत. त्यामुळे येथील पोस्ट कर्मचाऱ्यांबद्दल संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. केंद्र शासनाच्या कर्मचाºयांचे १ तारखेपूर्वीच पगार जमा होतात. मात्र त्या तुलनेत कर्तव्यात मात्र कसूर केला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही कायम आहे.
सर्व कार्यालये सुरु झाल्यानंतरही कोरोना प्रादूर्भाव असल्याने पोस्ट आॅफीस बंद आहे असे वारंवार सांगितले जाते. तुम्ही थेट तक्रार करा, काहीही होणार नाही, असे खातेधारकांना सांगत असल्याचे सानगडी येथील मिलिंद बोकडे, महेश निमजे यांनी सांगितले. कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार आहे.
सानगडी येथील पोस्ट आॅफीस कार्यालयातील मशीन गत चार महिन्यांपासून बंद असल्याने खातेधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील पोस्ट कर्मचाºयांना विचारपूस केली असता मशीन बंद असून वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे सांगितले. मात्र त्यावर वरीष्ठांकडून कोणताच तोडगा काढण्यात येत नसल्याने ग्राहकांनाच अधिकच्या व्याजाचा भरणा करावा लागणार आहे.
खातेधारकांच्या आरडी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ भरण्यात आलेल्या नाहीत त्यांना अधिकच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असताना पोस्ट आॅफीसच्या कामकाजामुळे त्रस्त झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा सानगडी येथील मिलिंद बोकडे, महेश निमजे यांनी दिला आहे. आता काय कारवाई होत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व्याजाचा भुर्दंड
पोस्ट कार्यालयात अनेकांनी आपले बचत खाते, सुकन्या योजनांचे खाते पोस्टात खोलले आहेत.महिण्याच्या अखेरपर्यंत पैसे न भरल्यास पोस्ट आॅफीसकडून त्या रकमेवर व्याज आकारणी करण्यात येते. लॉकडाऊनमध्ये अनेकजण आरडीचे पैसे भरण्यासाठी कार्यालयात गेले मात्र कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद असल्याचे सांगून पैसे भरण्यासाठी टाळाटाळ केरीत परत पाठविले. मात्र आता त्यानंतर काही महिणे लोटल्याने ग्राहकांनाच अधिकच्या व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे वरिष्ठांसह ग्रामीण भागातील पोस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारातून सदर व्याजाची रक्कम भरण्यात यावी अशी मागणी खातेधारकातून होत आहे. पोस्ट कार्यालयातील उद्धटपणाने वागणाºया कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

मशीन चार महिन्यांपासून बंद आहे. साकोलीत जावून पुस्तके भरली. कामामुळे साकोली येथे जावून पुस्तके भरणे शक्य नाही. मशीन बंद असल्याचे वरिष्ठांना सांगूनही दुरुस्ती न केल्याने खातेधारकांची गैरसोय होत आहे.
- मोनिका वासनिक
पोस्टमास्तर, सानगडी

Web Title: Post closed under Corona's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.