दहा लाख थकविल्याने रचला लुटमारीचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:00 AM2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:00:12+5:30

धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात सर्वच्या सर्व आठ आरोपींना जेरबंद करून संपूर्ण रक्कमही हस्तगत केली. 

A plot of plunder was hatched by exhausting ten lakhs | दहा लाख थकविल्याने रचला लुटमारीचा कट

दहा लाख थकविल्याने रचला लुटमारीचा कट

googlenewsNext
ठळक मुद्देमास्टरमाइंड रामदास आहे पाच ट्रकचा मालक

लाेकमत न्यूज नेटवर्क
साकोली : धान व्यापारी रमेश अण्णा याने ट्रक भाड्याचे १० लाख रुपये थकविल्याने लुटमारीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. साकोली तालुक्यातील पळसगाव-गोंडउमरी मार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या लुटमारीतील सर्व आरोपी जेरबंद झाले असून या घटनेचा मास्टरमाइंड रामदास भिरकड हा पाच ट्रकचा मालक आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून उर्वरित सात जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. 
साकोली तालुक्यातील पळसगाव-गोंडउमरी मार्गावर धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात सर्वच्या सर्व आठ आरोपींना जेरबंद करून संपूर्ण रक्कमही हस्तगत केली. 
रामदास भिरकड हा नागपूर येथील रहिवासी असून हैद्राबादवरून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तांदूळ आणण्याचे काम करीत होता. त्याच्याकडे पाच ट्रक असून १० लाख रुपये रमेश अण्णाने थकविल्याने हा कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यासाठी त्याने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेतली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर व त्यांच्या पथकाने केली.

असा लागला छडा
- दिवाणजीच्या सांगण्यानुसार घटनास्थळावर मोटारसायकल पडलेली होती. त्या बाजूला एक इसम झोपून होता. तेथून कार सहज निघून जाईल, अशी जागाही होती. परंतु चालकाने कार थांबविली. दोघेही खाली उतरले. तेव्हा दबा धरून बसलेले सात जण धावून आले. त्यांनी केवळ दिवाणजीच्याच डोळ्यात मिरची पावडर फेकली. चालकाला कोणतीही इजा केली नाही. यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी हिसका दाखविताच पोपटासारखा बोलू लागला. 
साळ्याच्या घरी रक्कम
- लुटमार केल्यानंतर आरोपी रामदासने संपूर्ण २२ लाख ६९ हजारांची रक्कम आपला साळा चेतन शिवणकर याच्या धर्मापुरी येथील घरी ठेवली होती. पोलिसांनी ती हस्तगत केली.

 

Web Title: A plot of plunder was hatched by exhausting ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.