जिल्ह्यात मंगळवारी केवळ एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:00 AM2021-06-23T05:00:00+5:302021-06-23T05:00:31+5:30

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वात नीचांकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी नोंदविण्यात आली. ७४७ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ लाखनी तालुक्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. एप्रिल महिन्यात १२०० च्या वर दैनंदिन रुग्ण आढळून येत हाेते. मंगळवारी केवळ एकच रुग्ण आढळून आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

Only one positive on Tuesday in the district | जिल्ह्यात मंगळवारी केवळ एक पॉझिटिव्ह

जिल्ह्यात मंगळवारी केवळ एक पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देसहा तालुके निरंक : ॲक्टिव्ह रुग्ण १०२

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मंगळवारी तर केवळ एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लाखनी तालुक्यात हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून इतर सहा तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात सध्या १०२ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. 
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंतचा सर्वात नीचांकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी नोंदविण्यात आली. ७४७ व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर केवळ लाखनी तालुक्यात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. एप्रिल महिन्यात १२०० च्या वर दैनंदिन रुग्ण आढळून येत हाेते. मंगळवारी केवळ एकच रुग्ण आढळून आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे १७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 
ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत असून सध्या जिल्ह्यात १०२ रुग्ण ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तर गत २२ दिवसात केवळ एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाने ११२५ व्यक्तींचा बळी गेला आहे. आतापर्यंत चार लाख ११ हजार ५६८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४४५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तर ५८ हजार २१८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. 
जिल्ह्यात सध्या १०२ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये भंडारा ३०, मोहाडी ११, तुमसर चार, पवनी चार, लाखनी १५, साकोली २७, लाखांदूर ११ रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांसोबत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनावरील ताण हलका झाला आहे. लसीकरणाची मोहीम जिल्हाभर वेगात सुरू आहे.

जिल्ह्यात मृतांची संख्या  ७० ने वाढली
- एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपुर्वी बाहेर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात झालेल्या कोरोना मृत्यूचे पोर्टल मंगळवारी अद्यवत झाले. त्यात भंडारा जिल्ह्यातील ७० जणांचा समावेश असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या ७० ने वाढली आहे. इतर जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांमध्ये भंडारा तालुका २५, मोहाडी दोन, तुमसर दहा, पवनी आठ, लाखनी चार, साकोली तीन, लाखांदूर १८ अशी ११२५ मृतांची संख्या झाली आहे.

 

Web Title: Only one positive on Tuesday in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.