चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:21 PM2019-08-19T22:21:09+5:302019-08-19T22:21:56+5:30

बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे.

Only 2 feet of water in Chandpur reservoir | चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देगरजेनुसार सोडणार जलाशयाचे पाणी : सोंड्याटोला प्रकल्पात दोन पंपगृह सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. यामुळे जलाशयातील जलसाठा लक्षात घेता गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.
सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने कटू सत्य अनुभवले आहे. वीज, पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती, निधी आणि अन्य समस्या घेऊन या प्रकल्पाने वाटचाल सुरु ठेवली आहे. परंतु गत वर्षापासून या प्रकल्प स्थळात समस्या निर्माण झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभर प्रकल्पस्थळात वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. वीज पुरवठा खंडीत होवू दिला नाही. यावर्षी ३४ हजार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यांनी रोखठोक प्रयत्न सुरु केले. प्रकल्पस्थळात निविदा विनाच शुक्रवारीपासून सहा पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. बावनथडी नदीचे पात्र तीन महिनेच वाहणारे असल्याने चांदपूर जलाशय तातडीने ओव्हरफ्लो झाले पाहिजे, अशी भूमिका आमदार वाघमारे यांनी घेतल्याने जलाशयात १५ दिवसात आठ फुट पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. जलाशयात २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. सध्या स्थित नदीचे पात्रात अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पस्थळात दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात आहे. या विभागाला हस्तांतरीत झाले आहे. परंतु पाटबंधारे विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाणी वाटप करताना माथापच्ची करण्याची वेळ येत आहे.
दरम्यान सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन पंपगृह आहेत. दोन पंपगृह गेल्या वर्षापासून नागपुरात दुरुस्ती करिता ठेवण्यात आली असून आजपावेतो नादुरुस्त पंपगृह परतली नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा प्रभावित ठरत आहे. या कार्यात कंत्राटदारांचा बेजबाबबदारपणा कारणीभूत ठरत आहे. दरम्यान मध्यंतरी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सभा घेण्यात आली होती.
या सभेला सभापती धनेंद्र तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पटले, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, पाटबंधारे विभागाचे हटवार, मिरत आणि डिंकवार उपस्थित होते. या बैठकीत चांदपूर जलाशयाचे पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. पाणी वाटप पूर्ण झाले असताना शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे सांगण्यात आले. यामुळे जलाशयात उर्वरीत असणारे पाणी शेतकºयांचे उपयोगात येणार आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

स्थिरीकरण योजना तारणार
बावनथडी नदी पात्रात पाणी राहत नसल्याने परिसरात रबीचे हंगामात पाणी अभावी धानाचे उत्पादन घेता येत नाही. परिसरात शेतकऱ्यांना कायमस्वरुपी तारण्यासाठी लोकप्रतिनिंधी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजना वैनगंगा नदीवर साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात आले आाहे. ही योजनांचे कामे जलद गतीने झाले पाहिजे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Only 2 feet of water in Chandpur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.