वाचनालयात ना बसायला जागा, ना वाचायला पुरेशी पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:00 AM2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:11+5:30

‘वाचाल तर वाचाल’ या वृक्ती प्रमाणे वाचनालय माणसाला समृध्द करतात. शासकीय अनुदानावर पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वाचनालय उघडण्यात आले आहे. यातील अपवाद वगळता. बहुतांश वाचनालयामध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे पुस्तके असली तरी येथील नियोजनाअभावी वाचक फिरकतांना दिसत नाही.

Not enough space in the library, not enough books to read | वाचनालयात ना बसायला जागा, ना वाचायला पुरेशी पुस्तके

वाचनालयात ना बसायला जागा, ना वाचायला पुरेशी पुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देसुविधांचा अभाव : ग्रामीण भागातील वाचनालयांची शोकांतिका

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : वाचन संस्कृती समृध्द करण्यात वाचनालयाचे मोठे योगदान असते. भंडारा जिल्ह्यातही अनेक गावात वाचनालयांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र पवनी तालुक्यातील बहुतांश वाचनालयात ना बसायला जागा आहे ना वाचायला पुरेशी पुस्तके आहेत. केवळ शासकीय अनुदानावर ही वाचनालय कागदोपत्री जीवंत आहेत.
‘वाचाल तर वाचाल’ या वृक्ती प्रमाणे वाचनालय माणसाला समृध्द करतात. शासकीय अनुदानावर पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी वाचनालय उघडण्यात आले आहे. यातील अपवाद वगळता. बहुतांश वाचनालयामध्ये सुविधांचा अभाव आहे. येथे पुस्तके असली तरी येथील नियोजनाअभावी वाचक फिरकतांना दिसत नाही. पुस्तके कपाटबंद दिसत आहेत.
शासकीय अनुदानातून खरेदी केलेल्या पुस्तकांना दुरावस्थेने वाचक मिळत नाही. अनेक तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र त्यांना गावातील वाचनालयात स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळत नाही. अड्याळ येथे एक सोडून दोन वाचनालय आहेत. परंतु येथील वाचनालयात कोणत्याही सुविधा दिसत नाही. काही ठिकाणची वाचनालय तर एकाच खोलीत सुरु आहेत. वर्तमानपत्र आणि पुस्तके तेथे असली तरी बसायला जागाच नाही. विद्यार्थ्यांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु सुविधा मात्र मिळाल्या नाही.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
काही वर्षांपुर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सहभागी होत नाही असे बोलले जात होते. परंतु आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. शहरात जावून शिकवणी लावणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे गावातील वाचनालयातच अभ्यास करण्याचा त्यांचा कल असतो. परंतु वाचनालयात सुविधा मिळत नाही. या वाचनालयावर ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष नियंत्रण नसले तरी सुविधांबाबत ग्रामपंचायत त्यांना सुचना देवू शकते. सुसज्ज वाचनालयासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Not enough space in the library, not enough books to read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.