Nagar Panchayat Election Results 2022 : लाखनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 03:28 PM2022-01-19T15:28:53+5:302022-01-19T15:30:30+5:30

लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. 

Nagar Panchayat Election Results 2022: NCP victory in Lakhni Nagar Panchayat | Nagar Panchayat Election Results 2022 : लाखनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा ताबा

Nagar Panchayat Election Results 2022 : लाखनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा ताबा

Next

भंडारा : लाखनी नगर पंचायतीत काँग्रेसला बाजूला सारत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फक्त २ जागा मिळवता आल्या असून १७ पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे.

भंडारा जिल्ह्यात लाखांदूर नगरपंचायत, लाखनी नगरपंचायत आणि मोहाडी नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यातील लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ज्यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या अपक्ष १ तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः याठिकाणी प्रचार केला होता. पण, मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

विजयी उमेदवार

प्रभाग क्र. १ - विपुल कांबळे (काँग्रेस)
प्रभाग क्र. २ - कांता निर्वाण (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ३ - राजेश निंबेकर ङ(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ४ - विभा अशोक हजारे (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ५ -  महेश आखरे (भाजप)
प्रभाग क्र. ६ - सारिका बशेशंकर (भाजप)
प्रभाग क्र. ७ - त्रिवेणी पोहरकर (राष्ट्रवादी) 
प्रभाग क्र. ८ - लता रोडे (भाजपा)
प्रभाग क्र. ९ - प्रदीप तितीरमारे (कॉंग्रेस)
प्रभाग क्र. १० - प्रेरणा व्यास (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ११ - निशा मोहरकर (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. १२ - संदीप भांडारकर (भाजप)
प्रभाग क्र. १३ - ज्योती निखाडे (अपक्ष)
प्रभाग क्र. १४ - अश्विन धरमसारे (भाजप)
प्रभाग क्र. १५ - सविता सोनवाने (भाजप)
प्रभाग क्र. १६ - अरमान धरमसारे (राष्ट्रवादी)  
प्रभाग क्र. १७ - सचिन भैसारे (राष्ट्रवादी)

Web Title: Nagar Panchayat Election Results 2022: NCP victory in Lakhni Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.