अपघातात आई ठार, मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : भरधाव ट्रक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी ...

Mother killed in accident, son serious | अपघातात आई ठार, मुलगा गंभीर

अपघातात आई ठार, मुलगा गंभीर

Next
ठळक मुद्देकुशारीची घटना : ट्रॅक्टरची मोटरसायकलला धडक




लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : भरधाव ट्रक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील कुशारी फाट्यावर सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
ताराबाई भुते (५०) रा. घाडकुरोडा ता. माहाडी असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा अरविंद भुते (२३) जखमी झाला आहे. अरविंद हा आपल्या आई ताराबाई यांना घेऊन बँकेत पैसे काढण्यासाठी दुचाकीने (क्रमांक एमएच ३६ एम ४७८९) मोहाडी येथील बँकेत येत होता. त्यावेळी कुशारी फाट्यावर मागून आलेल्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३६ डी ८१०९ ) मोटरसायकलला जबर धडक दिली. त्याम ताराबाई भूते यांच्या दोन्ही पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेला. गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मुलगा अरविंद हा गंभीररित्या जखमी झाला.
अरविंदला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ट्रक्टर चालकानी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे करीत आहे.
 

Web Title: Mother killed in accident, son serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात