Maharashtra Election 2019 ; काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षांचा हिशेब द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:48+5:30

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रदीप पडोळे यांच्या प्रचारार्थ तुमसर येथील नेहरू मैदानात शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, माजी खासदार शिशुपाल पटले, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, माजी आमदार अनिल बावनकर उपस्थित होते.

Maharashtra Election 2019 ; The Congress-NCP should give a fifteen-year account | Maharashtra Election 2019 ; काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षांचा हिशेब द्यावा

Maharashtra Election 2019 ; काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षांचा हिशेब द्यावा

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : तुमसर येथे महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. सत्तेत असताना त्यांनी किती विकास कामे केली याचा आधी हिशेब द्यावा, आपण पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्यापेक्षा दुप्पट कामे केली आहे. आगामी पाच वर्षात राज्यासह तुमसरच्या सर्वांगिण विकासाची आपण ग्वाही देतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रदीप पडोळे यांच्या प्रचारार्थ तुमसर येथील नेहरू मैदानात शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, माजी खासदार शिशुपाल पटले, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, माजी आमदार अनिल बावनकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत बारा वाजले. विधानसभा निवडणुकीत घड्याळाचे काटे बंद होणार आहे. काँगे्रसची स्थिती अतिशय वाईट आहे. या निवडणुकीत राहूल गांधी दिसत नाही. बँकॉकला फिरायला गेले होते, असे ते म्हणाले.
गत पाच वर्षात राज्यात ५० हजार कोटींची कामे केली आहे. ३० हजार कोटींचे रस्ते बांधले. २० हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्गाची कामे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. १८ हजार गावांना पाणीपुरवठा करण्यात आला असून २०२१ पर्यंत सर्वांना घरे देणार आहो. रोहा-मुंढरी पूल बांधकामाला मंजुरी दिली आहे. तुमसर शहराला आतापर्यंत दीडशे कोटींचा निधी दिला, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी महिला, बेरोजगार, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद फुलेकर, योगेश सिंगनजुडे, आशिष कुकडे, प्रमोद घरडे, नगरसेवक राजा लांजेवार, सुनील पारधी, सचिन बोपचे, श्याम धुर्वे, विद्या फुलेकर, संजय कुंभलकर, कल्याणी भुरे, सभापती रोशना नारनवरे, शिला डोये, पंकज बालपांडे उपस्थित होते. संचालन नितीन कारेमोरे यांनी तर आभार आशिष कुकडे यांनी मानले.

शरद पवारांची स्थिती शोलेच्या जेलरसारखी
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची स्थिती शोलेतील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर, पीछे मैदान साफ अशी स्थिती झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राष्ट्रवादीवर तोफ डागली.
राज्यात एकही बंडखोर निवडून येणार नाही
अनेकांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली. मात्र राज्यात एकही बंडखोर निवडून येणार नाही. तुमसरात चरण वाघमारे यांनी भाजप उमेदवार प्रदीप पडोळे यांना समर्थन द्यावे. २४ आॅक्टोबरनंतर बंडखोरांसाठी भाजपचे दरवाजे कायम बंद होतील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The Congress-NCP should give a fifteen-year account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.