दाेन लाख 80 हजार व्यक्ती निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 05:00 AM2021-04-30T05:00:00+5:302021-04-30T05:00:44+5:30

आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ८४.९३ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Lakh 80 thousand people are negative | दाेन लाख 80 हजार व्यक्ती निगेटिव्ह

दाेन लाख 80 हजार व्यक्ती निगेटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देतीन लाख २९ हजार चाचण्या : चाचण्याच्या तुलनेत १५ टक्के आढळले पाॅझिटिव्ह

ज्ञानेश्वर मुंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी आतापर्यंत तपासणी केलेल्या तीन लाख २९ हजार ८५७ व्यक्तींपैकी तब्बल दाेन लाख ७९ हजार ८७५ व्यक्तींचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. चाचणीच्या तुलनेत आतापर्यंत १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲन्टिजन चाचणी करण्यात आली आहे. 
भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असून, सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मृताचा आकडाही वाढत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत दिलासादायक बाब म्हणजे काेराेना चाचण्यांच्या तुलनेत केवळ १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळत आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात ही टक्केवारी दहाच्याही आत हाेती; मात्र गत दाेन महिन्यांपासून काेराेना संसर्ग वाढल्याने टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मार्च २०२० पासून काेराेना चाचण्यांना सुरुवात झाली आतापर्यंत तीन लाख २९ हजार ५४८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर ५७ हजार ८९०, ॲन्टिजन २ लाख ७१ हजार ३७२ आणि टीआरयू- एनएटी २८६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. 
आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ८४.९३ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सुरुवातीच्या काळात अनेकांनी चाचण्यांची धास्ती घेतली हाेती. पाॅझिटिव्ह आलाे तर काय? असा प्रश्न निर्माण झाला हाेता. गत दाेन महिन्यात काेराेना संसर्ग वाढल्याने सर्दी पडसा झालेले आणि बाहेरगावाहून आलेले व्यक्तीही तत्काळ काेराेना चाचणी करून घेत असल्याचे दिसत आहे. अलीकडे आरटीपीसीआर चाचण्या कमी प्रमाणात करण्यात येत असून, ॲन्टिजन चाचण्यावर भर आहे. 
अनेक जण एचआरसीटी स्कॅन करून आपला स्काेर पाहत आहे. चाचण्यांच्या तुलनेत पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण कमी असणे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. बरे हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे.

गुरुवारी ३४ मृत्यू १११० पाॅझिटिव्ह
भंडारा जिल्ह्यात गुरुवारी ३४ जणांचा काेराेनाने मृत्यू तर १११० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ३४ मृत्यूमध्ये भंडारा तालुक्यातील १६, तुमसर आणि पवनी येथे प्रत्येकी ३ साकाेलीत सहा, लाखनी पाच, माेहाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर  १११० पाॅझिटिव्ह व्यक्तींमध्ये भंडारा तालुक्यातील ४०५, माेहाडी ६३, तुमसर १५३, पवनी १६८, लाखनी ५७, साकाेली २१५ आणि लाखांदूर तालुक्यातील ४९ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यापैकी ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या आहेत. तर ८१७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १५ हजार ९४०, माेहाडी ३१५२, तुमसर ४६९७, पवनी ४३७६, लाखनी ४१०७, साकाेली ३५७०, लाखांदूर १९५१ व्यक्तींचा समावेश आहे. तर ८१७ मृत्यूमध्ये भंडारा ४०२, माेहाडी ७४, तुमसर ९०, पवनी ८६, लाखनी ६१, साकाेली ६७, लाखांदूर ३७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात गत काही दिवसात मृत्यूची संख्या वाढत आहे. सरासरी २५ जणांचा मृत्यू हाेत असल्याचे दिसत आहे. मृतांमध्ये पन्नाशीच्या आतील व्यक्तींचा समावेश आहे. लक्षणे आढळल्यावर उपचारास दिरंगाई याला कारणीभूत आहे.

 

Web Title: Lakh 80 thousand people are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.