The influence of Emperor Asheka on world culture | जगाच्या संस्कृतीवर सम्राट अशाेकाचा प्रभाव

जगाच्या संस्कृतीवर सम्राट अशाेकाचा प्रभाव

भंडारा : सम्राट अशाेक हे दूरदृष्टी असलेले चक्रवर्ती सम्राट हाेते. सम्राट अशाेकाची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस, सीझर, चेंगीजखान, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपाेलियन यांच्याशी केली जाते; परंतु त्याच्यापेक्षाही ते श्रेष्ठ हाेते. त्याच्या लाेककल्याणकारी व इतरही अमाेघ कार्याचा केवळ भारतावरच प्रभाव पडला आहे, असे नाही तर जगाच्या संस्कृतीवरही अशाेकाची माेहाेर उमटलेली दिसते, असे प्रतिपादन अशाेककालीन ऐतिहासिक साहित्याचे अभ्यासक महेंद्र शेगावकर यांनी केले.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने सम्राट अशाेक जयंतीनिमित्त माैर्यकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा ' या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयाेजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बाेलत हाेते. अशाेकाचा कालखंड हा अत्यंत समृद्धीचा हाेता. दंतकथेच्या आधारे इतिहास लिहिला जात नाही. अशाेकाच्या संदर्भात व्हावे तितके संशाेधन झाले नाही. उत्खनन, चिन्ह, शिलालेख, स्तंभ, लिपीचा अभ्यास, लेणी, प्रवासवर्णन यांच्या माध्यमातून हाेणे आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशाेकाच्या शिलालेखाचे तत्कालीन माैर्यलिपीचा अभ्यास करून संशाेधन झाले पाहिजे. तसेच अशाेकाचा इतिहास समजून घेण्यासाठी लेणी आणि लिपी महत्त्वाची आहे; म्हणून पुरातत्त्वीय पुरावे अभ्यासून आपण नव्याने इतिहास मांडायला हवा असेही ते म्हणाले. व्याख्यानाकरिता संयाेजक प्रशांत वंजारे व समन्वयक गंगाधर ढवळे यांनी सहकार्य केले. महामंडळाचे अध्यक्ष अशाेक बुरबुरे, पदाधिकारी डॉ. सीमा मेश्राम, अमृत बन्साेड, अरविंद निकाेसे, डॉ. सुरेश खाेब्रागडे, संजय डाेंगरे, छाया खाेब्रागडे, संजय माेखडे, देवानंद सुटे यांनी सहकार्य केले.

Web Title: The influence of Emperor Asheka on world culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.