जमिनीची सुपिकता व भरघोष उत्पन्नाचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:29+5:30

महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन थेट शेतावरच सुरु झाले आहे. एकुण सहा वर्ग निश्चित केले आहेत. प्रथम व द्वितीय वर्ग आटोपले आहेत.

The goal of soil fertility and abundant income | जमिनीची सुपिकता व भरघोष उत्पन्नाचे ध्येय

जमिनीची सुपिकता व भरघोष उत्पन्नाचे ध्येय

Next
ठळक मुद्देहरभऱ्याची शेतीशाळा : पालांदूरच्या मंडळ कृषी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : जमिनीची सुपिकता राखून शेतकऱ्यांना भरघोष उत्पन्न देण्याच्या प्रयत्नांसाठी कृषी विभाग सज्ज झाले आहे. एकच एक पीक घेत असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे वास्तव स्वीकारीत शेतकऱ्यांना कागदी माहिती पुरविण्यापेक्षा थेट शेतातच शाळा भरवल्या गेली. याचे प्रात्यक्षिक लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १३ गावात अनुभवायला मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणांतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शेतीशाळेचे नियोजन केले आहे. यात २५ शेतकऱ्यांची पटसंख्या ठेवण्यात आली आहे. यात प्रती शेतकऱ्याला मोफत बी बियाणे, खत, किडनाशक, पक्षीथांबे, पुरविण्यात येत आहेत. जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन थेट शेतावरच सुरु झाले आहे. एकुण सहा वर्ग निश्चित केले आहेत. प्रथम व द्वितीय वर्ग आटोपले आहेत. यात पुरुषांचा व महिलांचा असे दोन वर्ग तयार केले आहेत. शेती शाळेत भूगाव, पळसगाव, घोडेझरी, पालांदूर, ढिवरखेडा, कवडसी, कनेरी, जेवनाळा, गोंडेगाव, पाथरी, नरव्हा, सोमनाळा, कन्हाळगाव असे १३ गावात शेतीशाळा सुरु झाली आहे. शेतशाळेत जमीन तयार करणे, बियाणे निवड, बीज प्रक्रिया, रासायनिक खतांची मात्रा, पिक संरक्षण, मित्रकिडी, शत्रूकिडी, पक्षीथांबे, कामगंध साफळे, फेरोमन ट्रप्स आदी विषयाची वर्ग सुरु झाली आहेत. शेतकºयांना एकदल पिकानंतर द्विदल पिके घेणे व पिकांची फेरपालट करणे व जमिनीचा पोत सुधारणे हा खरा हेतू आहे.
शेतीशाळेला मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहाय्यक वनिता खंदाडे, गिºहेपुंजे, श्रीकांत सपाटे, भगीरथ सपाटे, कृषी पर्यवेक्षिका एम.एन. खराबे, अशोक जिभकाटे, शेतकरी मित्र भाऊराव कोरे सहभागी आहेत.
लाखनी तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादूर्भाव असल्यास घाटेअळीवरती क्विनॉलफॉस १० लिटर पाण्यात २० मिली किंवा इमामेक्टीन बेंजोएट १० लिटर पाण्यामध्ये ३ ते ४ ग्रामच्या प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. ही फवारणी फुलकळी येणे सुरु झाल्यास १ लिटर फवारणी करावी, असे सांगितले.

दिवसेंदिवस रबीमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढत आहे. कमी पाण्यात उत्तम पीक हातात येत आहे. हरभºयाला ओले व सुका विकताना दर उत्तम मिळत आहे. त्यामुळे शेतीशाळेत शेतकरी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
-गणपती पांडेगावकर,
मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर

Web Title: The goal of soil fertility and abundant income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती