Freestyle fights between two policemen at Bhandara | भंडारा येथे दोन पोलिसांत फ्री स्टाईल मारामारी
भंडारा येथे दोन पोलिसांत फ्री स्टाईल मारामारी

ठळक मुद्देआरोपींना खर्रा देण्यावरुन वादजिल्हा रुग्णालयासमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दोन पोलीस कर्मचाऱ्यात भर चौकात फ्री स्टाईल मारामारी झाल्याची घटना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आरोपींना खर्रा देण्याच्या वादातून हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. तुर्तास या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद मात्र करण्यात आली नव्हती.
जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी काही आरोपींना घेवून येथील जिल्हा रुग्णालयात गेले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णालयासमोरील चौकात दोन पोलीस कर्मचाऱ्यात तुफान हाणामारी सुरु झाली. पोलिसांमध्ये सुरु असलेली हाणामारी पाहण्यासाठी बघ्याची गर्दी झाली. रुग्णालयात तपासणीसाठी आणलेल्या आरोपींना खर्रा देण्यावरुन वाद झाल्याचे सांगण्यात येते. एका पोलिसाने त्याला विरोध केल्याने ही हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. तूर्तास या दोघांची नावे कळू शकली नाही. मात्र त्यांच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या सदंर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना संदर्भात विचारले असता, या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागविण्यात आली असून संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल, असे सांगितले. 

Web Title: Freestyle fights between two policemen at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.