तीन मुलींना डॉक्टर आणि एकीला अधिकारी करणारा बाप माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:18+5:30

देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : एका अशिक्षित कुटुंबात जन्म. घरी अठराविश्व दारिद्र्य. फुगे विकून शिक्षण पूर्ण केले. ...

The father who made three daughters doctors and one officer | तीन मुलींना डॉक्टर आणि एकीला अधिकारी करणारा बाप माणूस

तीन मुलींना डॉक्टर आणि एकीला अधिकारी करणारा बाप माणूस

Next
ठळक मुद्देवडेगावचे डामराज बारमाटे । फुगे विकून आणि विडीयाकेले होते स्वत:चे शिक्षण पूर्ण, मुलींनी केले कष्टाचे चीज

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एका अशिक्षित कुटुंबात जन्म. घरी अठराविश्व दारिद्र्य. फुगे विकून शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची महती जाणणाऱ्या या विडी कामगाराच्या या मुलाच्या चार मुलींनी त्यांच्या कष्टाचे चीज केले. तीन मुली डॉक्टर तर एक मुलगी महाराष्ट्र शासनात अधिकारी आहे. हा बाप माणूस आहे, मोहाडी तालुक्यातील वडेगाव (खैरलांजी) येथील डामराज विश्वनाथ बारमाटे.
नागपूरच्या अन्वेषण विभागातून अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले डामराज यांचे बालपण अत्यंत खडतर गेले.
विडी व्यवसाय करणाºया कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चार वर्षाचे असताना वडीलांचा मृत्यू झाला. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी विड्या वळून आणि गावागावांत फुगे विकून आपले शिक्षण घेतले. एमए समाजशास्त्र झाल्यानंतर १९७६ साली त्यांना नागपूरच्या अन्वेषण विभागात नोकरी लागली. १९७६ मध्ये गीता सोबत लग्न झाले. त्या नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. या दांपत्याला चारही मुलीच आहेत. आपण शिक्षणासाठी घेतलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नये याची काळजी या बाप माणसाने सदैव घेतली आणि आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले.
त्यांची ज्येष्ठ कन्या ज्योत्स्ना महिला व बालकल्याण विभागात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे. तर डॉ.नयना, डॉ.स्वीटी आणि डॉ.सपना या तिघी वैद्यकीय क्षेत्रात आपले आणि आपल्या वडीलांचे नाव उज्ज्वल करीत आहे. डॉ.नयना भोपाळ येथील आॅल इंडिया मेडीकल सायन्स कॉलेज (एम्स) मध्ये प्राध्यापक आहे. त्या सर्जन आहेत. तर डॉक्टर स्वीटी या मुंबई येथे नेव्हीमध्ये आपली वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉ.सपना रायपूरच्या शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी आणि घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या डामराज यांनी जिद्दीच्या भरवशावर आपलेच शिक्षण पूर्ण केले नाही तर आपल्या मुलींनाही अत्युच्च पदावर पोहचविले. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने या बाप माणसाला सलाम.

समाज सेवेचा अविरत वसा
नागपूरच्या अ‍ॅडमिशन विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डामराज बारमाटे यांनी समाज सेवेचा वसा सुरू केला. आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानज्योती मुलांचे वसतीगृह सिटी गर्ल्स होस्टेल, नयना मुलींचे बाल सदन, बाल आपत्ती निवारण केंद्र महिला प्रशिक्षण आदी उपक्रम ते राबवितात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा विविध संस्थांच्यावतीने गौरव करण्यात आला आहे.
 

Web Title: The father who made three daughters doctors and one officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.