उत्तरासह हस्त नक्षत्रातील पावसाने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:36+5:30

गत महिन्याभरापासून सतत सुरु असलेल्या पावसाने सर्व सामान्यच नाही तर शेतकरी सुध्दा आता पुरते कंटाळले आहेत. वरुण राजा आतातरी थांब, अशी आर्त विणवनी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उतरासह हस्त नक्षत्रातील जोरदार पावसाने भातपिकासह भाजीपाला पिक धोक्यात आला आहे.

Farmers worried about rain in hand constellation with reply | उत्तरासह हस्त नक्षत्रातील पावसाने शेतकरी चिंतेत

उत्तरासह हस्त नक्षत्रातील पावसाने शेतकरी चिंतेत

Next
ठळक मुद्देवरुण राजा आता थांब थोडा : भात पिकासह भाजीपाला पिकांना अतिवृष्टीचा फटका

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत महिन्याभरापासून सतत सुरु असलेल्या पावसाने सर्व सामान्यच नाही तर शेतकरी सुध्दा आता पुरते कंटाळले आहेत. वरुण राजा आतातरी थांब, अशी आर्त विणवनी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उतरासह हस्त नक्षत्रातील जोरदार पावसाने भातपिकासह भाजीपाला पिक धोक्यात आला आहे.
गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करावी लागते. यावर्षीही सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून दररोज पाऊस कोसळत आहे. महिन्याभरात कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली. अनेक गावात पुर परिस्थिती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भीती निर्माण झाली. नदी तिरावरील शेतशिवाराला पुरावा फटका बसला. यामुळे शेतकरी आता धास्तावलेले दिसत आहे. महिन्याभरात असा एकही दिवस गेला नाही की पाऊस आला नाही.
शनिवारी रात्री भंडारा शहरासह जिल्ह्यात तब्बल दोन तास जोरदार पाऊस झाला. हस्त नक्षत्रातील पावसात प्रचंड विजेचा कडकडाट होत होता.

Web Title: Farmers worried about rain in hand constellation with reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती